मुख्यपृष्ठ / पाककृती / ब्रेड चा खाकरा

Photo of Bread Khakara by Jayshree Bhawalkar at BetterButter
464
3
0.0(0)
0

ब्रेड चा खाकरा

Jun-30-2018
Jayshree Bhawalkar
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ब्रेड चा खाकरा कृती बद्दल

खाकरा ही गुजराती पारंपरिक रेसिपी आहे.मी त्यात थोडं नावीन्य केले आहे,पीठां पासून न बनवता ब्रेड नी बनवला आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • गुजरात
  • शॅलो  फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 4 ब्रेड स्लाइस कडा कापलेल्या
  2. 2 चमचे बेसन
  3. 1/2 चमचा काळी मिरी पूड
  4. 1 चमचा जीरे पूड
  5. 3/4चमचा / चवीनुसार मीठ
  6. 2चमचे जीरावन मसाला
  7. 3 चमचे तेल शेकायला

सूचना

  1. एका वाडग्यात ब्रेड स्लाइस चुरून घ्या.
  2. ब्रेड च्या चुर्यात मिर पूड,जीरे पूड,आणि मीठ घालून पाण्यानी कणके सारख मळून घ्या.
  3. आता ह्या पिठा चे छोटे गोळे बनवून घ्या.
  4. प्रत्येकी पातळ पोळी लाटा जरूर असल्यास थोडं तेल लावू शकता.
  5. ह्या पोळ्या तव्यावर च आलटून पालटून शेकून घ्या.फ्रेंकी सारख शेकायचे आहे.
  6. ह्या पोळ्या एकावर एक ठेवत चला.
  7. आता हा पोळ्यांचा ढीग उलटून ठेवा म्हणजे सगळ्यात पहली पोळी (खालची) वर येईल.
  8. आता ह्या पोळ्या एक एक करून थोडं तेल लावून पराठा मेकर नी दाबून दाबून क्रिस्पी शेकून घ्या.
  9. ब्रेड च्या प्रत्येक खाखरा वर जीरावन मसाला भुरकवा.
  10. हे खाकरे एयर टाईट डब्यात ठेवा आणि हवे तेव्हा चहा बरोबर किंवा असेच खायला सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर