Photo of Sweet Rose by archana chaudhari at BetterButter
1036
5
0.0(0)
0

गोड गुलाब

Jun-30-2018
archana chaudhari
20 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

गोड गुलाब कृती बद्दल

छान आकारामुळे खूपच आकर्षक वाटतात हे गुलाब.....खाण्यासही छान लागतात....चहासोबत छान लागतात.

रेसपी टैग

  • व्हेज
  • कठीण
  • डिनर पार्टी
  • फ्रायिंग
  • डेजर्ट

साहित्य सर्विंग: 6

  1. गुलाबासाठी
  2. दूध 1/2 वाटी
  3. साखर 1/2वाटी
  4. तूप 1/4 वाटी
  5. मैदा 2 वाटी
  6. पाकासाठी
  7. साखर 1/2 वाटी
  8. पाणी 1/2 वाटी

सूचना

  1. गुलाबासाठी असणारे दूध,तूप,साखर एका भांड्यात एकत्र करून उकळायला ठेवा.
  2. आता मोठया भांड्यात ओता, त्यामध्ये मैदा घाला...अजून थोडा लागला तर टाका. छान मळून घ्या
  3. 15 मिनिटे झाकून ठेवा.
  4. पाकासाठी साखर आणि पाणी एकत्र करून एकतारी पाक करून घ्या.
  5. आता मळलेल्या उंडयाचा छोटा गोळा घेऊन त्याची पोळी लाटून घ्या.
  6. ह्या पोळीवर ग्लास ने प्रेस करून छोट्या 3 पुऱ्या बाजूला काढा
  7. आता ह्या तिन्ही पुऱ्या एकावर एक ठेवा
  8. त्याच्या मधोमध लागलेल्या पोळीचाच छोटासा कापलेल्या तुकड्याचा रोल ठेवा
  9. आता त्याच्या चारही बाजूंनी सुरीने काप द्या
  10. प्रत्येक बाजू मध्ये जोड
  11. पूर्ण पाकळ्या जोडून झाल्यावर गुलाब तळून घ्या.
  12. मध्यम आचेवर सावकाश तळा.
  13. आता सगळे गुलाब तळल्यावर वरून साखरेचा पाक टाका.
  14. शेवटी सजवतांना मी साखर पावडर टाकली.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर