क्विनोआ कटलेट | Quinoa cutlet Recipe in Marathi

प्रेषक Pranali Deshmukh  |  30th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Quinoa cutlet recipe in Marathi,क्विनोआ कटलेट, Pranali Deshmukh
क्विनोआ कटलेटby Pranali Deshmukh
 • तयारी साठी वेळ

  30

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

2

0

क्विनोआ कटलेट recipe

क्विनोआ कटलेट बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Quinoa cutlet Recipe in Marathi )

 • 2 बटाटे बॉईल
 • मटार 1/4 कप फ्रोजन किंवा फ्रेश
 • क्वीओना 1/2 कप
 • मिरची￰ पावडर 1 tbs
 • अद्रक पेस्ट 1/2 tbs
 • लसूण पेस्ट 1/2 tbs
 • कांदा 1/2 बारीक चिरून
 • हळद 1 tbs
 • गरम मसाला 1 tbs
 • कोथिंबीर बारीक चिरून 1 tbs
 • रवा 2 tbs
 • मैदा 2 tbs
 • मीठ
 • तेल तळण्यासाठी

क्विनोआ कटलेट | How to make Quinoa cutlet Recipe in Marathi

 1. क्वीओना धुवून घ्या आणि 1 कप पाण्यात शिजवून घ्या .मऊ होईपर्यंत.
 2. मटार बॉईल करून घ्या
 3. पॅन मध्ये थोडं तेल घाला अद्रक लसूण ,कांदा ,मिरची पावडर ,हळद गरम मसाला ,सर्व साहित्य 2 मिनिट परतवा
 4. मिक्सर जार मध्य क्वीओना मटार बटाटा मॅश करून आणि वरील परतवलेलेे साहित्य घाला आणि थोडं ग्राइंड करा .
 5. मिठ कोथिंबीर घालून मिक्स करा
 6. तुमच्या आवडीनुसार गोल लांबोळा आकार देऊन पॅटिस तयार करा .
 7. मैद्यामध्ये थोडं पाणी आणि मीठ घालून पातळ मिश्रण बनवा
 8. हे पॅटिस त्यामध्ये डीप करा आणि रव्यावर कोटिंग करा .
 9. तेल तापल्यावर गॅस मध्यम करून कटलेट तळून घ्या .
 10. तुम्ही सॉस किंवा हिरव्या चटणीबरोबर सर्व्ह करू शकता.

My Tip:

तुम्ही डीप फ्राय न करता शॅलो फ्राय पण करू शकता.

Reviews for Quinoa cutlet Recipe in Marathi (0)