मुख्यपृष्ठ / पाककृती / स्टफड् दही वडा

Photo of Stuffed dahi-vada by Susmita Tadwalkar at BetterButter
1139
6
0.0(0)
0

स्टफड् दही वडा

Jun-30-2018
Susmita Tadwalkar
130 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

स्टफड् दही वडा कृती बद्दल

नेहमीच्या दही वड्यापेक्षा वेगळ्या चवीचा

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • डिनर पार्टी
  • नॉर्थ इंडियन
  • फ्रायिंग
  • साईड डिश

साहित्य सर्विंग: 3

  1. एक वाटी ऊडीद डाळ
  2. तळण्यासाठी तेल
  3. मिठ चवीप्रमाणे
  4. २ वाट्या दही
  5. जिरा पावडर
  6. स्टफिंग साठी--
  7. २-३ हिरव्या मिरच्या
  8. ८-१० काजू पाकळ्या
  9. १/२ इंच आलं
  10. मुठभर बेदाणे
  11. कोथिम्बीर
  12. ओल्या खोबर्याचा एक तुकडा

सूचना

  1. ऊडीद डाळ धूवून २ तास भिजत घाला
  2. पाणी काढून टाका आणि बारिक वाटून घ्या
  3. थोडं मिठ घालून फेटून घ्या
  4. बेदाणे सोडून स्टफिंगचं सर्व साहित्य बारिक चिरुन घ्या
  5. आता बेदाणे घालून थोडं मिठ घालून मिसळून घ्या
  6. आता वाटलेल्या डाळीचा छोटा-सा गोळा घेऊन ओल्या कपड्यावर गोल थापा व त्यात स्टफिंग भरा
  7. कापडाची घडी‌ घालून करंजीचा आकार द्या
  8. थोडा पाण्याचा हात लावून वडा काढून घ्या व गरम तेलात तळून घ्या
  9. तेलातून काढून घ्या व पाण्यात टाका
  10. २ मिनिटांनी हलक्या हातानी दाबून पाणी काढून घ्या
  11. गार करून घ्या
  12. दही फेटून घ्या व वड्यावर घाला
  13. आवडत असल्यास चिंचेची चटणी, जिरा पावडर घालून थंड सर्व करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर