सरप्राईज कोन | Surprise kone Recipe in Marathi

प्रेषक Anita Bhawari  |  1st Jul 2018  |  
3 from 1 review Rate It!
 • Surprise kone recipe in Marathi,सरप्राईज कोन, Anita Bhawari
सरप्राईज कोनby Anita Bhawari
 • तयारी साठी वेळ

  15

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  7

  माणसांसाठी

17

1

सरप्राईज कोन recipe

सरप्राईज कोन बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Surprise kone Recipe in Marathi )

 • 5/6 तयार चपात्या
 • 3 बटाटे उकडून घेतलेल
 • कोबी
 • शिमला मिरची
 • गाजर
 • पनीर
 • मोझरेला चिझ
 • टोमॅटो केचप
 • बारीक शेव
 • काळीमिरी पावडर
 • ऑरिगॅनो
 • मीठ
 • मैदा पेस्ट
 • मिरची
 • टोमॅटो
 • कांदा
 • आल लसुण पेस्ट
 • तळण्यासाठी तेल

सरप्राईज कोन | How to make Surprise kone Recipe in Marathi

 1. सर्व प्रथम भाज्या स्वच्छ धुवून पुसुन बारीक चिरून घ्या
 2. कढईत तेल गरम करून कांदा मिरची मीठ टाकून लालसर होईपर्यंत हलवून घ्या आले लसुण पेस्ट काळीमिरी पावडर ऑरिगॅनो टाका सर्व भाज्या घाला बटाटा हाताने कुस्करून टाकून चांगले परतून घ्या
 3. भाजी थंड झाल्यावर पनीर व चिझ किसुन घाला
 4. चपातीचे 4 भाग कापून घेऊ
 5. चपातीला कोनाचा आकार देऊन कोन्रर मैदा पेस्ट ने चिटकवा
 6. अशाप्रकारे सगळे कोन तयार करून घेणे
 7. कढईत तेल गरम करण्यासाठी ठेवावे
 8. चमच्याने कोणामधे भाजी घट्ट दाबून भरावी
 9. भाजी बाहेर येऊ नये म्हणून वरतुन मैदा पेस्ट लावावी
 10. हळुच तेलात सोडून सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यावेत
 11. अशा प्रकारे
 12. टोमॅटो केचप आणि शेव घ्या
 13. कोन टोमॅटो केचप मध्ये बुडवून शेवमधये घोळवून घेतल
 14. आपले चमचमीत गरमागरम कोन तयार

My Tip:

लहान मुलांच्या बर्थडे पार्टी किंवा किटी पार्टीत करता येईल

Reviews for Surprise kone Recipe in Marathi (1)

Vidya Gurav2 months ago

मस्त च आहे
Reply

Cooked it ? Share your Photo