मुख्यपृष्ठ / पाककृती / स्टफ्फड आलू टिक्की

Photo of Stuffed Aloo Tikki by archana chaudhari at BetterButter
1061
1
0.0(0)
0

स्टफ्फड आलू टिक्की

Jul-01-2018
archana chaudhari
20 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

स्टफ्फड आलू टिक्की कृती बद्दल

शॅलो फ्राय केलेली स्टफ्फड आलू टिक्की हा एक हेल्दी ऑपशन आहे.

रेसपी टैग

  • मध्यम
  • शॅलो  फ्रायिंग
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. वरील कव्हर साठी
  2. बटाटे 3 उकडून मॅश केलेले
  3. आले पेस्ट 1/2 लहान चमचा
  4. हिरवी मिरची पेस्ट 1/2 लहान चमचा
  5. गरम मसाला 1/2 लहान चमचा
  6. फुटाणा डाळीची पावडर 1/2 वाटी
  7. मीठ चवीनुसार
  8. तेल 1 लहान चमचा
  9. स्टफिंग साठी
  10. ताजे वाटणे 1 वाटी उकडून मॅश केलेले
  11. हिरवी मिरची पेस्ट 1/2 लहान चमचा
  12. जिरं 1/4 लहान चमचा
  13. कोथिंबीर 2 मोठे चमचे बारीक चिरलेली
  14. आमचूर 1/2 लहान चमचा
  15. अनार दाना(optiobal) 1 चमचा
  16. मीठ चवीनुसार
  17. ब्रेड क्रम्स 2 मोठे चमचे
  18. तेल 2 मोठे चमचे(शॅलो फ्राय करण्यासाठी)

सूचना

  1. एक कढईत तेल टाकून आले,मिरची, मॅश केलेला बटाटा घाला.
  2. त्यात गरम मसाला,मीठ,फुटण्याची पावडर टाका.
  3. चांगले मिक्स करून 5 मिनिटे झाकून ठेवा.
  4. गार झाल्यावर एक भांड्यात काढून ठेवा.
  5. स्टफिंग साठी एक कढईत तेल टाका
  6. तेलात जिरे,मिरची पेस्ट,उकडलेला वाटाणा, कोथिंबीर, आमचूर, मीठ, अनार दाणा घाला
  7. चांगले मिक्स करून 2 मिनिटे ठेवून एका वाटीत काढा.
  8. आता बटाट्याच्या मिश्रणाचा छोटा गोळा घेऊन गोल वाटीसारखा आकार देऊन त्यात वाटण्याचे मिश्रण भरा.
  9. टिक्की छान बंद करून घ्या.या प्रमाणे सगळ्या टिक्क्या बनून घ्या.
  10. आता प्रत्येक टिक्की ब्रेड क्रम्स मध्ये घोळवून पॅन मध्ये शॅलो फ्राय करून घ्या.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर