अळूवडी | ALUVADI Recipe in Marathi

प्रेषक Deepa Gad  |  1st Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • ALUVADI recipe in Marathi,अळूवडी, Deepa Gad
अळूवडीby Deepa Gad
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  60

  मि.
 • किती जणांसाठी

  5

  माणसांसाठी

9

0

अळूवडी recipe

अळूवडी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make ALUVADI Recipe in Marathi )

 • अळूवड्याच्या अळूची पाने ६
 • बेसन २ वाट्या
 • आलं लसूण पेस्ट १ च
 • तिखट १ च
 • धनेजिरे पावडर १ च
 • मीठ
 • कोकमाचे पाणी किंवा आगळ
 • चिंचेचा कोळ ३ च

अळूवडी | How to make ALUVADI Recipe in Marathi

 1. १/२ वाटी पाण्यात १० कोकम घालून ठेवा किंवा आगळ घ्या
 2. अळूची पाने देठ काढून स्वच्छ धुऊन घ्या
 3. त्या देठांवर लाटणे फिरवा व पानांना कोकमाचे पाणी लावून घ्या
 4. बॉऊलमध्ये बेसन, तिखट, धनेजिरे पावडर, आलं लसूण पेस्ट, मीठ व चिंचेचा कोळ घालुन थोडंस पाणी घालून थोडं घट्ट पेस्ट बनवा
 5. ही पेस्ट कोकमाचे पाणी लावलेल्या पानांना लावून घ्या
 6. त्यावर दुसरे अळूचे पण ठेवून वरील प्रमाणेच कोकमाचे पाणी व पेस्ट लावा
 7. अशाप्रकारे ३ पानांना सर्व लावून एकावर एक ठेवा
 8. दोनी बाजुला दुमडा त्यावर बेसनची पेस्ट लावा व खालून गुंडाळत जा
 9. अशाप्रकारे रोल करून चाळणीला तेलाचा हात लावून त्यावर हे रोल ठेवा
 10. मोदकाप्रमाणे १५-२० मिनिटे वाफवा
 11. काढून थंड करण्यास फ्रीजमध्ये ठेवा
 12. वड्या पाडून तेलात शॅलो फ्राय किंवा डीप फ्राय करा

My Tip:

यात तुम्ही बेसनाच्या ऐवजी मुगाचे पीठही घालून बनवू शकता

Reviews for ALUVADI Recipe in Marathi (0)