स्वीट गिफ्ट रॅप | Sweet gift wrape Recipe in Marathi

प्रेषक Pranali Deshmukh  |  1st Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Sweet gift wrape recipe in Marathi,स्वीट गिफ्ट रॅप, Pranali Deshmukh
स्वीट गिफ्ट रॅपby Pranali Deshmukh
 • तयारी साठी वेळ

  40

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  5

  माणसांसाठी

4

0

स्वीट गिफ्ट रॅप recipe

स्वीट गिफ्ट रॅप बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Sweet gift wrape Recipe in Marathi )

 • मैदा 1 वाटी
 • रवा 2 tbs
 • तूप 2 tbs मोहन
 • 10 काजू
 • 10 बदाम
 • 10 पिस्ता
 • अक्रोड 3-4
 • काळे तीळ 1 tbs
 • 200 ग्राम खवा
 • पिठी साखर 1/4 कप
 • रोज इसेन्स 1 tbs
 • किंवा वेलची पावडर 1 tbs
 • तूप साजूक तळण्यासाठी
 • बिट रस 4 tbs किंवा लाल खाण्याचा
 • रंग चिमूटभर

स्वीट गिफ्ट रॅप | How to make Sweet gift wrape Recipe in Marathi

 1. सर्व ड्रायफ्रूट भाजून घ्या
 2. मिक्सरमधून जाडसर भरड करून घ्या
 3. कढईत खवा घाला आणि चमच्याने सारखे हलवत राहा जेणेकरून त्याच्यातील कच्चेपणा निघून जाईल
 4. साखर घाला आणि आळेपर्यंत सतत उखरत राहा
 5. साखर मिक्स होऊन जेव्हा खवा कढईला सोडेल तेव्हा ड्रायफ्रूट भरड घाला रोज इसेन्स घालून गॅस बंद करा.
 6. मैद्यामध्ये तूप घालून छान मिक्स करून घ्या चवीपुरतं मीठ तीळ घालून थोडं कोमट पाणी घालून मैदा भिजवून घ्या .आणि दहा मिनिट रेस्ट करा.
 7. थोड्या मैद्यामध्ये बिट रस किंवा रंग घालून पाणी घाला आणि पीठ घट्ट मळून घ्या.
 8. मैद्याचे छोटी गोळी घेवून लाटा चाकूने चौरस आकारात कापा.
 9. मध्ये सारण ठेवा आणि दोन्ही बाजूने फोल्ड करा.
 10. दोन बाजू जोडल्या आता आणखी दोन बाजू राहलेल्या अर्धवट फोल्ड करा .
 11. लाल रंगाच्या मैद्याची पातळ पोळी लाटा आणि पातळ स्ट्रिप्स कापून घ्या .
 12. हि स्ट्रीप सॅटिन रिबनसारखी वरून उभी आणि आडवी लावा चिकटवताना हलकंसं पाणी बोटाने लावा.
 13. मध्यम आचेवर तळून घ्या .

Reviews for Sweet gift wrape Recipe in Marathi (0)