BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / स्वीट गिफ्ट रॅप

Photo of Sweet gift wrape by Pranali Deshmukh at BetterButter
251
4
0(0)
0

स्वीट गिफ्ट रॅप

Jul-01-2018
Pranali Deshmukh
40 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

स्वीट गिफ्ट रॅप कृती बद्दल

मुलांना जर ड्रायफ्रूट खाऊ घालायचे असतील तर असं छान गिफ्ट रॅप बनवा .मुलं काहीतरी वेगळं दिसतंय म्हणून लगेच फस्त करतील आत काय लपलय याचा पत्ताही लागणार नाही .याशिवाय तुम्हाला कोणाला स्वीट द्यायचे असेल तर अशाप्रकारे रॅप करून बॉक्स मध्ये द्या नेहमी नेहमी तीच मिठाई तेच पेढे न देते असं काहीतरी करून बघा .

रेसपी टैग

 • व्हेज
 • मध्यम
 • इतर
 • इंडियन
 • फ्रायिंग
 • स्नॅक्स
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

 1. मैदा 1 वाटी
 2. रवा 2 tbs
 3. तूप 2 tbs मोहन
 4. 10 काजू
 5. 10 बदाम
 6. 10 पिस्ता
 7. अक्रोड 3-4
 8. काळे तीळ 1 tbs
 9. 200 ग्राम खवा
 10. पिठी साखर 1/4 कप
 11. रोज इसेन्स 1 tbs
 12. किंवा वेलची पावडर 1 tbs
 13. तूप साजूक तळण्यासाठी
 14. बिट रस 4 tbs किंवा लाल खाण्याचा
 15. रंग चिमूटभर

सूचना

 1. सर्व ड्रायफ्रूट भाजून घ्या
 2. मिक्सरमधून जाडसर भरड करून घ्या
 3. कढईत खवा घाला आणि चमच्याने सारखे हलवत राहा जेणेकरून त्याच्यातील कच्चेपणा निघून जाईल
 4. साखर घाला आणि आळेपर्यंत सतत उखरत राहा
 5. साखर मिक्स होऊन जेव्हा खवा कढईला सोडेल तेव्हा ड्रायफ्रूट भरड घाला रोज इसेन्स घालून गॅस बंद करा.
 6. मैद्यामध्ये तूप घालून छान मिक्स करून घ्या चवीपुरतं मीठ तीळ घालून थोडं कोमट पाणी घालून मैदा भिजवून घ्या .आणि दहा मिनिट रेस्ट करा.
 7. थोड्या मैद्यामध्ये बिट रस किंवा रंग घालून पाणी घाला आणि पीठ घट्ट मळून घ्या.
 8. मैद्याचे छोटी गोळी घेवून लाटा चाकूने चौरस आकारात कापा.
 9. मध्ये सारण ठेवा आणि दोन्ही बाजूने फोल्ड करा.
 10. दोन बाजू जोडल्या आता आणखी दोन बाजू राहलेल्या अर्धवट फोल्ड करा .
 11. लाल रंगाच्या मैद्याची पातळ पोळी लाटा आणि पातळ स्ट्रिप्स कापून घ्या .
 12. हि स्ट्रीप सॅटिन रिबनसारखी वरून उभी आणि आडवी लावा चिकटवताना हलकंसं पाणी बोटाने लावा.
 13. मध्यम आचेवर तळून घ्या .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर