कोलम्बी बोंबील पॅटीस | Prawns bombil pattice Recipe in Marathi

प्रेषक Rash amol  |  1st Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Prawns bombil pattice recipe in Marathi,कोलम्बी बोंबील पॅटीस, Rash amol
कोलम्बी बोंबील पॅटीसby Rash amol
 • तयारी साठी वेळ

  30

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

2

0

कोलम्बी बोंबील पॅटीस recipe

कोलम्बी बोंबील पॅटीस बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Prawns bombil pattice Recipe in Marathi )

 • 4 बोंबील साफ करून
 • 1 वाटी कोलम्बी साफ करून
 • 4 उकडून कुस्करलेले बटाटे
 • 1/2 वाटी ब्रेड क्रम्स
 • 1/2 वाटी लसूण आलं कोथींबीर मिरची वाटण
 • मिठ तिखट हळद गरम मसाला चवी नुसार
 • रवा वरून लावायला
 • तेल

कोलम्बी बोंबील पॅटीस | How to make Prawns bombil pattice Recipe in Marathi

 1. Hसगळे साहित्य जमा करा
 2. बोंबील कोळंबी ला हळद तिखट मीठ हिरवं वाटण लावून अर्धा तास म्यारीनेट करा. बोंबील वाफेवर उकडून घ्या व काटा काढून घ्या. कोलम्बी तेलावर परतून घ्या.
 3. बोंबील कुस्करलेले बटाटे हिरवं वाटण गरम मसाला हळद मीठ तिखट आमचूर ब्रेड क्रम्स घालून मिक्स करून घ्या.
 4. कोलम्बी परतून घ्या.
 5. बटाटा मिक्स ची पारी करून त्यात परतलेली कोलम्बी भरा. नीट सगळे पॅटीस भरून घ्या.
 6. पॅटीस रव्यात घोळवून तव्यावर तेल टाकून गुलाबी तळून घ्या.
 7. कोळंबी बोंबील पॅटीस तयार.

My Tip:

कोणताही मासा वापरून पॅटीस करता येतील.

Reviews for Prawns bombil pattice Recipe in Marathi (0)