साबुदाण्याचे कैरी भरलेले अप्पे | Sabudana stuffed with row mango filling Recipe in Marathi

प्रेषक Archana Chaudhari  |  1st Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Sabudana stuffed with row mango filling recipe in Marathi,साबुदाण्याचे कैरी भरलेले अप्पे, Archana Chaudhari
साबुदाण्याचे कैरी भरलेले अप्पेby Archana Chaudhari
 • तयारी साठी वेळ

  4

  तास
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  6

  माणसांसाठी

0

0

साबुदाण्याचे कैरी भरलेले अप्पे recipe

साबुदाण्याचे कैरी भरलेले अप्पे बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Sabudana stuffed with row mango filling Recipe in Marathi )

 • साबुदाणा 2 वाट्या छान भिजवलेला
 • शेंगदाण्याचे कूट 3/4 वाटी
 • बटाटा 2 मध्यम उकडून मॅश केलेले
 • हिरवी मिरची आणि जिरे पेस्ट 2 चमचे
 • मीठ चवीनुसार
 • तेल 1 मोठा चमचा
 • कैरी थोडी पिकलेली 1/2 वाटी मिक्सरमध्ये पेस्ट करून घेतलेली

साबुदाण्याचे कैरी भरलेले अप्पे | How to make Sabudana stuffed with row mango filling Recipe in Marathi

 1. भिजलेला साबुदाणा,शेंगदाण्याचे कूट, हिरवी मिरची आणि जिरे पेस्ट, मीठ, बटाटा चांगले एकत्र करा.
 2. थोडे पाणी टाकून सरबरीत भिजून घ्या.
 3. अप्पे पॅन तापायला ठेवा
 4. आता आधी थोडे साबुदाण्याचे मिश्रण टाका
 5. त्यावर कैरीची पेस्ट टाका.
 6. आता परत साबुदाण्याचे मिश्रण टाका
 7. याप्रमाणे सगळे अप्पे बनवा.
 8. शॅलो फ्राय करा थोडेसे तेल टाकून.
 9. दोन्ही बाजुंनी छान होऊ द्या.
 10. एक ताटात काढून घ्या

My Tip:

तुम्ही कैरीच्या पेस्ट ऐवजी साखरआंबा,उपवासाचे गोड लोणचे घालू शकता. :blush:

Reviews for Sabudana stuffed with row mango filling Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo

ह्या सारख्या दुसऱ्या पाककृती