मेथी कचोरी स्टफ्ड कढी गोळा | METHI kachori stuffed kadhi gola Recipe in Marathi

प्रेषक Chayya Bari  |  1st Jul 2018  |  
5 from 1 review Rate It!
 • METHI kachori stuffed kadhi gola recipe in Marathi,मेथी कचोरी स्टफ्ड कढी गोळा, Chayya Bari
मेथी कचोरी स्टफ्ड कढी गोळाby Chayya Bari
 • तयारी साठी वेळ

  20

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  45

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

8

1

मेथी कचोरी स्टफ्ड कढी गोळा recipe

मेथी कचोरी स्टफ्ड कढी गोळा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make METHI kachori stuffed kadhi gola Recipe in Marathi )

 • सारण साठी
 • धने जिरे पूड १/२चमचा प्रत्येकी
 • मेथी चिरलेली १वाटी
 • बेसन १वाटी
 • आलेलसुन पेस्ट १/२चमचा
 • जिरे १/२चमचा
 • तेल ४,५चमचे
 • गरम मसाला १चमचा
 • तिखट १/२चमचा
 • हळद १/२चमचा
 • बडीशेप १चमचा
 • तीळ १चमचा
 • आमचूर पावडर १/२चमचा
 • मीठ चवीनुसार
 • Covering साठी
 • मुगडाळ पाऊण वाटी
 • हरबरा डाळ पाव वाटी
 • आले लसूण पेस्ट १/२चमचा
 • हळद १चमचा
 • हिरवी मिरची पेस्ट १चमचा
 • मीठ चवीनुसार
 • कढीसाठी
 • दही १वाटी
 • बेसन ३चमचे
 • कढीपत्ता १काडी
 • जिरे,मोहरी १चमचा प्रत्येकी
 • हिरवी मिरची आले पेस्ट १चमचा
 • लाल मिरच्या २
 • लसूण पाकळ्या ५,६
 • मेथ्या पाव चमचा
 • हिंग चिमुटभर
 • तेल३चमचे
 • मीठ चवीनुसार
 • कोथिंबीर २चमचे
 • तेल तळण्यासाठी २०० ग्राम

मेथी कचोरी स्टफ्ड कढी गोळा | How to make METHI kachori stuffed kadhi gola Recipe in Marathi

 1. प्रथम सारण बनवण्यासाठी३चमचे तेल तापवून बेसन भाजून घेतले
 2. मग १चमचा तेलात जिरे घातले मग बडीशेप,तीळ ,आले लसूण पेस्ट घातली
 3. मग मेथी घालून परतली मग तिखट,गरम,मसाला,हळद,भाजलेले बेसन,आमचूर पावडर ,धने जिरे पावडर मीठ घालून परतले
 4. मेथीच्या ओलसर पणामुळे गोळा होतो तो वाफेवर मोकळा होईतो वाफ घेतली सारण तयार झाले
 5. त्याचे गोळे बनविले
 6. मग मिक्सरवर डाळ पाणी न घालता घट्ट बारीक वाटली व त्यात हळद हिरवी मिरची लसूण पेस्ट,मीठ घालून मिक्स केले
 7. मग वरील गोळे डाळीच्या मिश्रणात घोळून घेतले मिश्रण घट्ट असल्याने हातानेच डाळीचे मिश्रण लावावे
 8. तेल तापवून गोळे सर्व बाजूनी खरपूस तळावे
 9. Stuffincheगोळे तयार
 10. मग कढीची तयारी,
 11. बेसन व दही रवीने घुसळून एकत्र करावे
 12. मग तेल तापवून त्यात लाल मिरची टाळून लगेच काढावी,लसूण पाकळ्या तळून काढाव्या
 13. आता जिरे,मोहरी,मेथ्या फोडणीत घालाव्या त्यात कढीपत्ता घालावा मिरची पेस्ट परतावी मीठ घालावे
 14. मग दही व बेसन घुसळलेले मिश्रण ओतावे गरजेप्रमाणे पाणी घालून कधी उकळावी वरून कोथिंम्बीर घालावी
 15. वाढण्यापूर्वी गरम कढीत गोळे घालावे वर तळलेली मिरची,तळलेले लसूण घालावे
 16. भाकरी व भाताबरोबर छान लागते

My Tip:

हि माझी रेसिपी खरंच खूप छान लागली कचोरी,वडा, कढिगोळे ह्या तिन्ही चवीचा प्रत्यय येतो

Reviews for METHI kachori stuffed kadhi gola Recipe in Marathi (1)

Nayana Palav4 months ago

Wow
Reply

Cooked it ? Share your Photo