मुख्यपृष्ठ / पाककृती / METHI kachori stuffed kadhi gola

Photo of METHI kachori stuffed kadhi gola by Chayya Bari at BetterButter
1191
9
0.0(1)
0

METHI kachori stuffed kadhi gola

Jul-01-2018
Chayya Bari
20 मिनिटे
तयारीची वेळ
45 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • कठीण
  • डिनर पार्टी
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • फ्रायिंग
  • सौटेइंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. सारण साठी
  2. धने जिरे पूड १/२चमचा प्रत्येकी
  3. मेथी चिरलेली १वाटी
  4. बेसन १वाटी
  5. आलेलसुन पेस्ट १/२चमचा
  6. जिरे १/२चमचा
  7. तेल ४,५चमचे
  8. गरम मसाला १चमचा
  9. तिखट १/२चमचा
  10. हळद १/२चमचा
  11. बडीशेप १चमचा
  12. तीळ १चमचा
  13. आमचूर पावडर १/२चमचा
  14. मीठ चवीनुसार
  15. Covering साठी
  16. मुगडाळ पाऊण वाटी
  17. हरबरा डाळ पाव वाटी
  18. आले लसूण पेस्ट १/२चमचा
  19. हळद १चमचा
  20. हिरवी मिरची पेस्ट १चमचा
  21. मीठ चवीनुसार
  22. कढीसाठी
  23. दही १वाटी
  24. बेसन ३चमचे
  25. कढीपत्ता १काडी
  26. जिरे,मोहरी १चमचा प्रत्येकी
  27. हिरवी मिरची आले पेस्ट १चमचा
  28. लाल मिरच्या २
  29. लसूण पाकळ्या ५,६
  30. मेथ्या पाव चमचा
  31. हिंग चिमुटभर
  32. तेल३चमचे
  33. मीठ चवीनुसार
  34. कोथिंबीर २चमचे
  35. तेल तळण्यासाठी २०० ग्राम

सूचना

  1. प्रथम सारण बनवण्यासाठी३चमचे तेल तापवून बेसन भाजून घेतले
  2. मग १चमचा तेलात जिरे घातले मग बडीशेप,तीळ ,आले लसूण पेस्ट घातली
  3. मग मेथी घालून परतली मग तिखट,गरम,मसाला,हळद,भाजलेले बेसन,आमचूर पावडर ,धने जिरे पावडर मीठ घालून परतले
  4. मेथीच्या ओलसर पणामुळे गोळा होतो तो वाफेवर मोकळा होईतो वाफ घेतली सारण तयार झाले
  5. त्याचे गोळे बनविले
  6. मग मिक्सरवर डाळ पाणी न घालता घट्ट बारीक वाटली व त्यात हळद हिरवी मिरची लसूण पेस्ट,मीठ घालून मिक्स केले
  7. मग वरील गोळे डाळीच्या मिश्रणात घोळून घेतले मिश्रण घट्ट असल्याने हातानेच डाळीचे मिश्रण लावावे
  8. तेल तापवून गोळे सर्व बाजूनी खरपूस तळावे
  9. Stuffincheगोळे तयार
  10. मग कढीची तयारी,
  11. बेसन व दही रवीने घुसळून एकत्र करावे
  12. मग तेल तापवून त्यात लाल मिरची टाळून लगेच काढावी,लसूण पाकळ्या तळून काढाव्या
  13. आता जिरे,मोहरी,मेथ्या फोडणीत घालाव्या त्यात कढीपत्ता घालावा मिरची पेस्ट परतावी मीठ घालावे
  14. मग दही व बेसन घुसळलेले मिश्रण ओतावे गरजेप्रमाणे पाणी घालून कधी उकळावी वरून कोथिंम्बीर घालावी
  15. वाढण्यापूर्वी गरम कढीत गोळे घालावे वर तळलेली मिरची,तळलेले लसूण घालावे
  16. भाकरी व भाताबरोबर छान लागते

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Nayana Palav
Jul-01-2018
Nayana Palav   Jul-01-2018

Wow

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर