ग्रीन चणा कचोरी | Green chana kachori Recipe in Marathi

प्रेषक Pranali Deshmukh  |  1st Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Green chana kachori recipe in Marathi,ग्रीन चणा कचोरी, Pranali Deshmukh
ग्रीन चणा कचोरीby Pranali Deshmukh
 • तयारी साठी वेळ

  30

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  3

  माणसांसाठी

11

0

ग्रीन चणा कचोरी recipe

ग्रीन चणा कचोरी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Green chana kachori Recipe in Marathi )

 • फिलिंगसाठी साहित्य
 • हिरवा फ्रेश चणा हरभरा 1 वाटी
 • मैदा 1 वाटी
 • जिरे 1 tbs
 • मोहरी 1 tbs
 • हिंग चिमूटभर
 • तिखट 1 tbs
 • हळद 1/2 tbs
 • मीठ
 • साखर 1 tbs
 • आमचूर पावडर 1 tbs
 • सोप 1 tbs
 • तेल तळण्यासाठी
 • आवरणासाठी साहित्य
 • मैदा 1 वाटी
 • मीठ
 • तेल 2 tbs

ग्रीन चणा कचोरी | How to make Green chana kachori Recipe in Marathi

 1. हरभऱ्यातील दाणे काढून घ्या आणि मिक्सरला वाटून घ्या .
 2. पॅनमध्ये 1/2 tbs तेल टाकून जिरे मोहरी हिंग सोप टाका वाटलेला चणा टाका ,
 3. तिखट हळद मीठ घालून मिक्स करा
 4. आमचूर पावडर आणि साखर टाकून मिक्स करा झाकण ठेवून वाफ काढा .सारण तयार कचोरीसाठी
 5. मैद्यामध्ये मीठ आणि मोहन घालून छान मिक्स करून घ्या आणि पाणी घालून पीठ घट्ट मळून घ्या 20 मिनिट झाकून ठेवा .
 6. थोडा तेलाचा हात घेऊन मळून घ्या .run
 7. पेठ्याएवढे गोळे करून तळहातावर खोलगट वाटीसारखा आकार द्या आणि त्यामध्ये चमच्याने सारण भरा
 8. सर्व कडा जोडून हाताने प्रेस करा अशा प्रकारे सर्व कचोऱ्या बनवून घ्या .
 9. कढईत तेल टाका तेल तापायला सुरुवात झाल्याबरोबर बसतील इतक्या कचोऱ्या सोडा .तेलाचे तापमान जसे जसे वाढते तसे कचोरी फुगायला लागतात.
 10. अधून मधून कचोरी पलटावी आणि गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्या .
 11. मस्त सॉस किंवा चटणी बरोबर सर्व्ह करा .

Reviews for Green chana kachori Recipe in Marathi (0)