स्टफड बांगडा फ्राय | Stuffed Bangda Fry Recipe in Marathi

प्रेषक Aarti Nijapkar  |  1st Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Stuffed Bangda Fry recipe in Marathi,स्टफड बांगडा फ्राय, Aarti Nijapkar
स्टफड बांगडा फ्रायby Aarti Nijapkar
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  25

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

3

0

स्टफड बांगडा फ्राय recipe

स्टफड बांगडा फ्राय बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Stuffed Bangda Fry Recipe in Marathi )

 • बांगडा २ मोठे
 • लाल सुख्या मिरच्या ८ ते १०
 • ओलं खोबरं १/३ वाटी
 • कांदा १ लहान
 • आलं १/२ इंच
 • लसूण पाकळ्या ६ ते ७
 • कोथिंबीर १ मोठा चमचा
 • हळद १/२ लहान चमचा
 • धने १ मोठा चमचा
 • जिरे १/२ लहान चमचा
 • साखर १ लहान चमचा
 • सफेद विन्हेगर १ मोठा चमचा
 • मीठ चवीनुसार
 • तेल तळण्यासाठी

स्टफड बांगडा फ्राय | How to make Stuffed Bangda Fry Recipe in Marathi

 1. बांगडा साफ करून स्वच्छ धुवून घ्या फक्त मधल्या पोटातील घाण व डोळे काढा बांगड्याचे तुकडे करू नये
 2. आता मिक्सरच्या जार मध्ये लाल सूख्या मिरच्या , कांदा ,ओलं खोबरं , कोथिंबीर , आलं ,लसूण ,जिरे ,धने ,हळद , मीठ व व्हिनेगर व थोडं पाणी घालून पेस्ट बनवून घ्या
 3. पेस्ट मध्ये सर्व मसाले व्यवस्थित वाटले गेले पाहिजे ह्याची काळजी घ्यावी
 4. आता बांगडा वरून आणि खालच्या बाजूस म्हणजे पोटात चीर मारून घ्या
 5. त्यात वाटलेला मसाला भरून घ्या
 6. तव्यात तेल घालून तापवून घ्या मग भरलेले बांगडे तेलात सोडून द्या
 7. मध्यम आचेवर ४ ते ५ मिनिटे ठेवून द्या
 8. मग अलगद बाजू पालटून द्या काळजीपूर्वक
 9. दुसरी बाजूही ४ ते ५ मिनिटे तळून घ्या
 10. अश्याप्रकारे स्टफड बांगडा तयार आहे
 11. गरमागरम चपाती सोबत किंवा वरण भातासोबत खा

My Tip:

ह्या पाककृती मध्ये कोणताही बदल करू नये

Reviews for Stuffed Bangda Fry Recipe in Marathi (0)