क्रीमी मशरूम पापलेट फ्राय | Creamy Muahroom Pomfret Fry Recipe in Marathi

प्रेषक Aarti Nijapkar  |  1st Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Creamy Muahroom Pomfret Fry recipe in Marathi,क्रीमी मशरूम पापलेट फ्राय, Aarti Nijapkar
क्रीमी मशरूम पापलेट फ्रायby Aarti Nijapkar
 • तयारी साठी वेळ

  15

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  3

  माणसांसाठी

0

0

क्रीमी मशरूम पापलेट फ्राय recipe

क्रीमी मशरूम पापलेट फ्राय बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Creamy Muahroom Pomfret Fry Recipe in Marathi )

 • पापलेट फ्राय
 • पापलेट ३ मध्यम आकाराचे
 • तांदळाचे पीठ ३ मोठे चमचे
 • मीठ चवीनुसार
 • काळीमिरी पावडर १ मोठा चमचा
 • तेल तळण्यासाठी
 • क्रिमी मशरूम
 • मशरूम १५० ग्रॅम
 • कांदा १ लहान बारीक चिरलेला
 • हिरवी मिरची १
 • काळीमिरी जाडसर १/२ लहान चमचा
 • मीठ चवीनुसार
 • फ्रेश क्रीम ३ मोठे चमचे
 • मैदा १ लहान चमचा
 • बटर १ मोठा चमचा

क्रीमी मशरूम पापलेट फ्राय | How to make Creamy Muahroom Pomfret Fry Recipe in Marathi

 1. पापलेट फ्राय
 2. पापलेट साफ करून धुवून घ्या मध्ये दोन्ही बाजूने चीर मारून घ्या
 3. आता एक ताटात तांदळाचे पिठ , मीठ चवीनुसार , काळीमिरी पावडर घालून एकत्र करून घ्या
 4. मग पापलेट ह्या मिश्रणात घोळवून घ्या दोन्हीं बाजूला लावून घ्या
 5. तव्यात तेल घालून तापवून घ्या
 6. पापलेट तेलात सोडून मध्यम आचेवर दोन्ही बाजूने तळून घ्या
 7. तळलेले पापलेट तव्यावर वरच्या बाजूस सरकवून ठेवा म्हणजे त्यातील तेल निघून जाईल आणि कुरकुरीत होतील असे सर्व पापलेट तळुन घ्या
 8. क्रिमी मशरूम
 9. एक खोलगट पॅन तापवून त्या मध्ये बटर घाला मग मैदा घालुन परतवून घ्या
 10. मग बारीक चिरलेला कांदा व मशरूम ,हिरवी मिरची घालून परतवून घ्या लालसर झाले की त्यात काळीमिरी , मीठ चवीनुसार घालून एकत्र करून घ्या
 11. आत फ्रेश क्रीम व थोडे पाणी घालून मिश्रण एकजीव करून घ्या
 12. हे मिश्रण ४ ते ५ मिनिटे शिजवून घ्या गॅस बंद करा
 13. आता फ्राय केलेल्या पापलेट वर हे तयार क्रिमी मशरूम चे मिश्रण घाला व सर्व करा मस्त खाण्यास तयार आहे
 14. चपाती, पाव सोबत किंवा स्टार्टर म्हणून खा

My Tip:

मशरूम आधी पाण्यात थोडं मीठ घालून उकळवून घ्या

Reviews for Creamy Muahroom Pomfret Fry Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo