मुख्यपृष्ठ / पाककृती / बोंबील भरता फ्राय

Photo of Bombil Bharta Fry by Aarti Nijapkar at BetterButter
1327
2
0.0(0)
0

बोंबील भरता फ्राय

Jul-01-2018
Aarti Nijapkar
50 मिनिटे
तयारीची वेळ
35 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बोंबील भरता फ्राय कृती बद्दल

वेगळी पाककृती सर्वांनाच आवडते आणि ती जर पहिल्या फेरीतच चवदार झाली आनंदीआनंद...तर अशीच आजची पाककृती आहे बोंबील भरता फ्राय चटकदार बोंबील भरतीचा आणि कुरकुरीत बोंबील फ्राय दोन्हीचा आस्वाद एकाच पाककृती घेऊ.

रेसपी टैग

  • नॉन व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • फ्युजन
  • पॅन फ्रायिंग
  • फ्रायिंग
  • सौटेइंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. बोंबील भरता
  2. बोंबील ३ मध्यम आकाराचे
  3. कोकम आगळ १ लहान चमचा
  4. तेल १ मोठा चमचा
  5. जिरे १ लहान चमचा
  6. कांदा बारीक चिरलेला १ मोठा
  7. टोमॅटो बारीक चिरलेला १ मध्यम
  8. लसूण ३ ते ४ पाकळ्या
  9. हिरवी मिरची २ ते ३
  10. कोथिंबीर बारीक चिरलेली १ मोठा चमचा
  11. गरम मसाला १/२ लहान चमचा
  12. मीठ चवीनुसार
  13. बोंबील फ्राय
  14. बोंबील कापलेले ७ ते ८
  15. लाल तिखट १ मोठा चमचा
  16. धने पावडर १ मोठा चमचा
  17. मीठ चवीनुसार
  18. रवा बारीक १ मोठा चमचा
  19. तेल तव्यावर तळण्यासाठी
  20. कोथिंबीर सजावटीसाठी

सूचना

  1. प्रथम सर्व बोंबील साफ करून धुवून घ्या बोंबील मधले पाणी दाबून काढून टाका
  2. बोंबील भरीत
  3. भरीत साठी लागणारे बोंबील बाजूला काढा
  4. आता बोंबील ला तेल लावून घ्या व गॅस वर थोडे भाजून घ्या काळसर करू नयेत
  5. भाजून घेतलेले बोंबील बारीक कापा किंवा कुस्करून घ्या
  6. कढईत तेल घालून तापवून घ्या त्यात जिरे व लसूण ठेचून घाला व परतवून घ्या
  7. आता बारीक चिरलेला कांदा व टोमॅटो व हिरवी मिरची घालून लालसर होईपर्यंत परतवून घ्या
  8. मग चवीनुसार मीठ , गरम मसाला , हळद व लहान चमचा कोकम आगळ घाला व मिश्रण व्यवस्थित एकत्र करून घ्या
  9. कुस्करून घेतलेल बोंबील घाला व एकजीव करून घ्या थोडंस पाणी शिंपडून घ्या
  10. बारीक चिरलेली कोथिंबीर घाला मिश्रण एकत्र करून ३ ते ४ मिनिटे वाफवून घ्या मग गॅस बंद करा
  11. बोंबील फ्राय
  12. बॉम्बलाचे तुकडे घ्या त्याला मधून खोलगट अशी चीर मारून घ्या मग कोकम किंवा कोकम आगळ चोळून घ्या
  13. एका ताटात लाल तिखट ,हळद, धने पावडर , चवीनुसार मीठ , बारीक रवा एकत्र करून घ्या
  14. बॉम्बलाच्या आत तयार बोंबील भरीत भरून घ्या (प्रमाणात असावे) सर्व अश्याप्रकारे भरून घ्या
  15. तयार केलेल्या सुखा मसाला म्हणजे रवा मसाला भरलेले बोंबील त्यात सर्व बाजूनी घोळवून घ्या व्यवस्थित सर्वी कडे मसाला लागला पाहिजे
  16. तव्यात तेल घालून तापवून घ्या
  17. भरून आणि मसाल्यात घोळवून घेतलेले बोंबील तव्यावर ठेवून दोन्हीं बाजुंनी व्यवस्थित तळुन घ्या
  18. तयार भरता बोंबील फ्राय एका ताटात काढून त्यावर चिरलेली कोथिंबीर घालून सजावट करा
  19. खाण्यास तयार आहे चपाती , भाकरी , भातासोबत किंवा स्टार्टर म्हणून नुसती सुद्धा खाऊ शकतो
  20. तर नक्की करून बघा ही आगळीवेगळी पाककृती तुम्हाला नक्की आवडेल

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर