ओपन फेस्ड सँडविच | Open-faced Sandwiches Recipe in Marathi

प्रेषक Sanjeeta KK  |  14th Aug 2015  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Open-faced Sandwiches by Sanjeeta KK at BetterButter
ओपन फेस्ड सँडविच by Sanjeeta KK
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

5750

0

ओपन फेस्ड सँडविच recipe

ओपन फेस्ड सँडविच बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Open-faced Sandwiches Recipe in Marathi )

 • 3 काप - ब्राऊन ब्रेड
 • 1/2 वाटी चण्याचे पीठ
 • 1/2 वाटी अंकुरित मुग
 • 2 हिरव्या मिरच्या
 • 1 मोठा कांदा
 • 1 मोठा टोमॅटो
 • 1 भोपळी मिरची
 • कोथिंबीर आणि पुदिन्याची पाने
 • 1/2 लहान चमचा चिली फ्लेक्स
 • 1/4 लहान चमचा हळद पूड
 • 1/4 लहान चमचा मीठ
 • 1 चिमूटभर हिंग
 • आवश्यकतेनुसार पाणी
 • परतण्यासाठी थोडेसे तेल

ओपन फेस्ड सँडविच | How to make Open-faced Sandwiches Recipe in Marathi

 1. कांदा, हिरव्या मिरच्या, टोमॅटो, कोथिंबीर, पुदिन्याची पाने आणि भोपळा मिरची या सर्व सामग्रीला धुऊन बारीक चिरा.
 2. एक मोठा वाडगा घ्या, त्यात चण्याच्या डाळीचे पीठ, अंकुरित मुग, मीठ, चिली फ्लेक्स, हिंग, हळद घालून चांगले एकजीव होईपर्यंत हलवा.
 3. यात इतके पाणी घाला की मिश्रण ओतले जाण्याइतके जाड बनेल.
 4. तवा गरम करा किंवा सँडविच टोस्टर तयार करा.
 5. ब्रेडला त्रिकोणी कापून प्रत्येक तुकड्याला मिश्रणात बुडवा.
 6. प्रत्येक काप टोस्टरमध्ये ठेवा, नंतर मिश्रणातून थोड्या भाज्या घेऊन ब्रेडवर ठेवा.
 7. आता थोडे तेल शिंपडा आणि ब्रेडला 2 ते 3 मिनिटांपर्यंत दोन्ही बाजूंनी शिजवा.
 8. या स्वादिष्ट ओपन फेस्ड सँडविचला कॅचप किंवा घरी बनविलेल्या कोणत्याही चटणीबरोबर वाढा.

My Tip:

या न्याहारीला अधिक पौष्टिक बनविण्यासाठी तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या घालू शकतात.

Reviews for Open-faced Sandwiches Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo