ओल्या खोबऱ्याची करंजी | Coconut karanji Recipe in Marathi

प्रेषक Deepa Gad  |  1st Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Coconut karanji recipe in Marathi,ओल्या खोबऱ्याची करंजी, Deepa Gad
ओल्या खोबऱ्याची करंजीby Deepa Gad
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  60

  मि.
 • किती जणांसाठी

  6

  माणसांसाठी

1

0

ओल्या खोबऱ्याची करंजी recipe

ओल्या खोबऱ्याची करंजी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Coconut karanji Recipe in Marathi )

 • सारणासाठी :
 • ओले खोबरे खवलेले २ वाट्या
 • साखर १ वाटी
 • वेलचीपूड १/२ च
 • काजू तुकडे व मनुका
 • पारीसाठी:
 • १ कप मैदा
 • तूप १ च
 • मीठ चवीनुसार
 • दूध आवश्यकतेनुसार
 • तळण्यासाठी तेल

ओल्या खोबऱ्याची करंजी | How to make Coconut karanji Recipe in Marathi

 1. पारीसाठी :
 2. मैदा, मीठ, तूप एकत्र एकजीव करा
 3. आवश्यकतेनुसार दूध घालून मळा व १० मिनिटे झाकुन ठेवा
 4. सारणासाठी :
 5. ओले खोबरे खवलेले, साखर, घालून मायक्रोव्हेव मध्ये ५ मिनिटे शिजवा नंतर त्यात काजू तुकडे, मनुका, वेलचीपूड घालून परत २-३ ,मिनिटे शिजवा.
 6. पिठाच्या छोट्या छोट्या गोळ्या करून पाऱ्या लाटून घ्या
 7. त्यात सारण भरून कडांना पाणी लावून करंजीचा आकार देऊन कापा
 8. तेलात तळा
 9. या आपल्या तयार ओल्या खोबऱ्याच्या करंज्या

My Tip:

या करंज्या ओल्या खोबऱ्याच्या असल्यामुळे लगेच खाऊन संपवाव्या लागतात, तसेच सारण कढईतही भाजू शकता

Reviews for Coconut karanji Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo