स्कुड मसाला रोल्स | Squid Masala Rolls Recipe in Marathi

प्रेषक Aarti Nijapkar  |  1st Jul 2018  |  
5 from 1 review Rate It!
 • Squid Masala Rolls recipe in Marathi,स्कुड मसाला रोल्स, Aarti Nijapkar
स्कुड मसाला रोल्सby Aarti Nijapkar
 • तयारी साठी वेळ

  30

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  6

  माणसांसाठी

3

1

स्कुड मसाला रोल्स recipe

स्कुड मसाला रोल्स बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Squid Masala Rolls Recipe in Marathi )

 • स्कुड / माकुल ४
 • खोबरं १/२ वाटी
 • लसूण पाकळ्या ५ ते ६
 • धने २ मोठे चमचे
 • लाल तिखट १ मोठा चमचा
 • गरम मसाला १ लहान चमचा
 • जीरा मसाला १ लहान चमचा
 • कॉर्न स्टार्च २ मोठे चमचे
 • व्हिनेगर १ लहान चमचा
 • कोथिंबीर १ मोठा चमचा
 • मीठ चवीनुसार
 • तेल तळण्यासाठी

स्कुड मसाला रोल्स | How to make Squid Masala Rolls Recipe in Marathi

 1. स्कुड व्यवस्थित साफ करून घ्या त्यावरची पातळ त्वचा काढून टाका पाण्याने स्वच्छ धुवून घ्या
 2. आता मसाला बनवून घेऊ त्यासाठी मिक्सर च्या जार मध्ये खोबरं, लसूण ,धने जिरे , लाल तिखट , गरम मसाला , कोथिंबीर व थोडे पाणी घालून पेस्ट बनवून घ्या
 3. पेस्ट मध्ये व्हिनेगर व चिरलेली कोथिंबीर घालून एकजीव करून घ्या
 4. तयार मसाला स्कुड मध्ये भरून घ्या मसाला भरल्यावर वरच्या बाजूस कॉर्न स्टार्च लावून म्हणजे मसाला तळताना बाहेर निघणार नाही
 5. सर्व ह्या प्रकारे बनवून घ्या
 6. आता लाल तिखट व थोडं कॉर्न स्टार्च एकत्र करून थोडं पाणी घालून पेस्ट बनवून घ्या
 7. भरलेल्या स्कुड वर ही पेस्ट लावून घ्या
 8. तवा गॅस वर ठेवून त्यात तेल तापवून घ्या
 9. स्कुड तव्यावर तेलात ठेवा व तळून घ्या २ ते ३ मिनिटे प्रत्येकी बाजूस
 10. त्यावर झाकण ठेवा कारण स्कुड चा थोडा आकार बदलतो (वाढतो) व तेल उडते म्हणून
 11. अश्याप्रकारे सर्व स्कुड फ्राय करून घ्या
 12. गरमागरम स्कुड मसाला रोल्स तयार आहे
 13. रोल्स कापून घ्या

My Tip:

खोबरे कोणतेही वापरू शकता

Reviews for Squid Masala Rolls Recipe in Marathi (1)

Ajinkya Shende4 months ago

Ma'am 1st Prize Confirm Milnar Hya Dish La...
Reply
Aarti Nijapkar
4 months ago
Tysm