कारले फ्राय | Karale fry Recipe in Marathi

प्रेषक Aarti Nijapkar  |  1st Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Karale fry recipe in Marathi,कारले फ्राय, Aarti Nijapkar
कारले फ्रायby Aarti Nijapkar
 • तयारी साठी वेळ

  25

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

5

0

कारले फ्राय recipe

कारले फ्राय बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Karale fry Recipe in Marathi )

 • कारले उकळविण्यासाठी
 • कारले ३ ते ४ मध्यम आकाराचे
 • कोकम किंवा चिंच
 • मीठ
 • पाणी
 • कारले मसाला करण्यासाठी
 • कारले
 • ब्रेड क्रमब्स ४ ते ५ चमचे
 • लाल तिखट २ मोठे चमचे
 • धने पावडर १ मोठा चमचा
 • जीरा पावडर १ मोठा चमचा
 • गरम मसाला १ लहान चमचा
 • कोथिंबीर बारीक चिरलेली १ मोठा चमचा
 • मीठ चवीनुसार
 • तेल तळण्यासाठी

कारले फ्राय | How to make Karale fry Recipe in Marathi

 1. कारल्याचं वरचा भाग थोडं काढून घ्या मधून कापून घ्या त्यातल्या सर्व बिया काढून टाका
 2. पाणी गरम करून त्यात कोकम किंवा चिंच व मीठ घाला उकळी येऊ द्या मग कारले घाला व उकळून घ्या खूप वेळ उकळवायचे नाही आहे
 3. फक्त थोडं कडवट पणा जाण्यासाठी पाण्यात उकळवून घ्यायचं आहे
 4. कारले पाण्यातून काढून ठेवा व थोडे दाबा म्हणजे जास्तीचं पाणी निघून जाईल
 5. एका ताटात ब्रेड क्रमब्स , लाल तिखट , धने जिरे पावडर ,गरम मसाला,हळद , चवीनुसार मीठ घाला चिरलेली कोथिंबीर घालून मिश्रण एकत्र करून घ्या
 6. कारले मसाल्यात व्यवस्थित घोळवून घ्या व मसाला वरून बोटांनी दाबून घ्या
 7. तव्यात तेल तापवून घ्या व कारले तेलात घालून मंद आचेवर तवा फ्राय करून घ्या
 8. दोन्हीं बाजूने छानसं लालसर तळून घ्या
 9. गरमागरम कारले फ्राय तयार आहे

My Tip:

ब्रेड क्रम्बच्या ऐवजी तांदळाचे पीठ वापरू शकता

Reviews for Karale fry Recipe in Marathi (0)