ताजा जवळा कटलेट | Taja Jawla Cutlet Recipe in Marathi

प्रेषक Aarti Nijapkar  |  1st Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Taja Jawla Cutlet recipe in Marathi,ताजा जवळा कटलेट, Aarti Nijapkar
ताजा जवळा कटलेटby Aarti Nijapkar
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

3

0

ताजा जवळा कटलेट recipe

ताजा जवळा कटलेट बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Taja Jawla Cutlet Recipe in Marathi )

 • ताजा जवळा १ वाटी
 • कांदा चिरलेला १ मोठा
 • कोथिंबीर चिरलेले २ मोठे चमचे
 • हिरवी मिरची ४ ते ५ लहान आकाराचे
 • लसूण पाकळ्या ५ ते ६
 • आलं १/२ इंच
 • जीरा १ मोठा चमचा
 • धने १ मोठा चमचा
 • तांदळाचे पीठ १/४ वाटी
 • बाजरीचे पीठ १/४ वाटी
 • बेसन २ मोठा चमचा
 • लाल तिखट १ लहान चमचा
 • हळद १/२ लहान चमचा
 • खसखस १ मोठा चमचा
 • मीठ चवीनुसार
 • तेल तळण्यासाठी

ताजा जवळा कटलेट | How to make Taja Jawla Cutlet Recipe in Marathi

 1. जवळा साफ करून धुवून घ्या
 2. मिक्सर जार मध्ये कोथिंबीर , हिरवी मिरची ,आलं , लसूण , जिरे , धने , वाटून घ्या
 3. कढईत तेल घालुन त्यात चिरलेला कांदा घालून परतवून घ्या
 4. आता वाटलेलं हिरवा मसाला घालून परतवून घ्या व्यवस्थित परतवून घ्या
 5. आता लाल तिखट , हळद, खसखस ,मीठ चवीनुसार घालून परतवून घ्या
 6. मग जवळा घालून मसाल्यात एकजीव करून घ्या
 7. एका ताटात झालेला जवळा काढून घ्या
 8. आता ह्यात तांदळाचं व बाजरीचं पीठ व बेसन घालून मिश्रण मळून घ्या
 9. मध्यम आकाराचे किंवा हव्या त्या आकाराचे कटलेट बनवून घ्या
 10. तवा तापवून त्यात तेल घाला कटलेट तेलात घालून मध्यम आचेवर शॅलो फ्राय करून घ्या
 11. दोन्हीं बाजूने सोनेरी होईपर्यंत तळून घ्या
 12. झालेलं कटलेट ताटात काढून घ्या सर्व असल्याप्रकारे तळून घ्या
 13. गरमागरम ताज्या जवळ्याचे कटलेट तयार आहे सॉस सोबत किंवा चटणीसोबत खा

Reviews for Taja Jawla Cutlet Recipe in Marathi (0)