इंडो चायनीज टिक्की | Indo chainese tikki Recipe in Marathi

प्रेषक Aarti Nijapkar  |  1st Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Indo chainese tikki recipe in Marathi,इंडो चायनीज टिक्की, Aarti Nijapkar
इंडो चायनीज टिक्कीby Aarti Nijapkar
 • तयारी साठी वेळ

  35

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  25

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

13

0

इंडो चायनीज टिक्की recipe

इंडो चायनीज टिक्की बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Indo chainese tikki Recipe in Marathi )

 • इंडोचे बाहेरील मिश्रण  
 • उकडलेली बटाटे २ मोठी 
 • वाफवलेले हिरवे मटार     १/२ कप
 • कोर्न फ्लार       १ टेबलस्पून 
 • लाल तिखट       १ टिस्पून 
 • गरम मसाला     १/२ टिस्पून 
 • मीठ     १/४ टिस्पून 
 • चिरलेली कोथिंबीर  १ टेबलस्पून 
 • चायनीज आतील मिश्रण 
 • (सर्व भाज्या उभ्या चिरुन घ्या)
 • गाजर         १/४ कप
 • शिमला मिरची       १/४ कप
 • कोबी           १/४ कप
 • चिली गार्लिक साॕस   १/२ टिस्पून 
 • सोया साॕस   १ टिस्पून 
 • टोमॅटो केचप    १ टिस्पून 
 • विनेगर    १/२ टिस्पून 
 • साखर     १/४ टिस्पून 
 • ब्रेड क्रेम्स   १/२ कप
 • तेल आवश्यकतेनुसार

इंडो चायनीज टिक्की | How to make Indo chainese tikki Recipe in Marathi

 1. टिक्कीच्या बाहेरील आवरणाची कृती (इंडो)
 2. एका खोलगट भांड्यात उकळून घेतलेले बटाटे, वाफवून  घेतलेले मटार हे थोडेसे हाताने एकत्र  करुन घ्या.मग कोर्न फ्लार, लाल तिखट, गरम मसाला, मीठ व चिरलेली कोथिंबीर घालून  मिश्रण छान एकजीव करा. हे मिश्रण काही वेळ झाकून ठेवून द्या
 3. टिक्कीच्या आतील मिश्रण (चायनीज )
 4. धुऊन उभे चिरुन घेतलेल्या भाज्या  घ्या पॕन मध्ये  १ टिस्पून तेल तापवून घ्या  मग भाज्या घालून परतून घ्या, (अर्ध्या कच्च्या ठेवायचे आहेत) मग चिली गार्लिक साॕस, सोया साॕस,  टोमॅटो केचप , विनेगर, साखर घालून मिश्रण एकजीव करुन घ्या गॕस बंद करा तयार मिश्रण साधारण २ ते ३ मिनिटे ठेवून द्या.
 5. आता बटाट्याचे तयार आवरण मिश्रण  घ्या
 6. छोटे  गोळे करुन ह्यात चायनीज मिश्रण घालून  स्टफ करुन टिक्की बनवा  हव्या त्या आकाराचे
 7. टिक्की बनवून  एका पसरट ताटात ठेवून द्या
 8. एका खोलगट भांड्यात  ब्रेड क्रेम्स  घ्या
 9. पॕन मध्ये तेल तापवून प्रत्येकी  टिक्की ब्रेड क्रम्स मध्ये घोळवून मंद आचेवर दोन्ही बाजूस टिक्की  शॕलो फ्राय करुन घ्या
 10. गरमा गरम इंडो चायनीज टिक्की तयार
 11. (येथे मीठ आपण फक्त टिक्कीच्या बाहेरील आवारणात घातले आहे , आतील मिश्रणात साॕस मध्ये मीठ असल्यामुळे आपण मीठ घातले नाही)

My Tip:

भाज्या खूप शिजवू नये.  आवडीचे भाज्या वापरु शकता (लवकर शिजणारे)

Reviews for Indo chainese tikki Recipe in Marathi (0)