अळुवडी | Aluwadi Recipe in Marathi

प्रेषक Anita Bhawari  |  2nd Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Aluwadi recipe in Marathi,अळुवडी, Anita Bhawari
अळुवडीby Anita Bhawari
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

2

0

अळुवडी recipe

अळुवडी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Aluwadi Recipe in Marathi )

 • अळू पान (3 जुडी )
 • तांदुळ पिठ (अर्धवाटी )
 • बेसन पिठ (2वाटी )
 • सोयाबीन चंगस (6/7 मिक्सर मधून बारीक पावडर करून घ्यावेत )
 • हळद
 • लसुण मिरची जिर पेस्ट
 • मीठ
 • तळण्यासाठी तेल
 • पाणी

अळुवडी | How to make Aluwadi Recipe in Marathi

 1. अळू पान स्वच्छ धुवून पुसुन त्याच्या शिरा काढुन घ्यावेत व पुन्हा धुवून पुसुन घ्या
 2. सगळी पिठ एकत्र करून लसुण मिरची जिर पेस्ट हळद मीठ पाणी घालून घट्टसर भिजवून घ्या
 3. पानाच्या पाठची बाजु वरती करून सगळ्या बाजुने पीठ पसरवून लावा अशा प्रकारे बाकी पान एकमेकांवर ठेवून पीठ लावून घट्ट रोल करून घेणे
 4. टोपात पाणी घालून वरतुन चाळण ठेवून वाफेवर वडी शिजवून घ्या
 5. कढईत तेल गरम करून त्यात खरपूस तळून घ्या

My Tip:

अळुवडी तळून नाही खाली तरी अशीही छान लागते

Reviews for Aluwadi Recipe in Marathi (0)