मुख्यपृष्ठ / पाककृती / झणझणीत ऊंबर फूल

Photo of Momos with Spaicy Curry by Bharti Kharote at BetterButter
540
2
0.0(0)
0

झणझणीत ऊंबर फूल

Jul-02-2018
Bharti Kharote
480 मिनिटे
तयारीची वेळ
90 मिनिटे
कूक वेळ
7 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

झणझणीत ऊंबर फूल कृती बद्दल

ही पाककृती पारंपारिक आहे खांदेश मध्ये मोठ्या प्रमाणात केली जाते..

रेसपी टैग

  • व्हेज
  • कठीण
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • प्रेशर कूक
  • स्टीमिंग
  • मेन डिश
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 7

  1. पाव किलो चनाडाळ
  2. पाव किलो गव्हाचे पीठ
  3. 100 ग्रॅम बेसन पीठ
  4. पाव चमचा ओवा हिंग हळद जीरे पूड धने पुड
  5. दोन चमचा लाल तिखट गरम मसाला
  6. एक चमचा आल लसूण हिरवी मिरची पेस्ट
  7. अर्धी वाटी कोथिंबीर
  8. चवीनुसार मीठ
  9. फोडणी साठी तेल जीरे मोहरी
  10. पाणी आवश्यकतेनुसार
  11. एक चमचा खसखस
  12. अर्धी वाटी खोबरे खीस

सूचना

  1. 7/8 तास चना डाळ भिजवून चाळणीत काढून घ्या. .
  2. एका वाडग्यात गव्हाचे पीठ बेसन पिठ घेऊन त्यात मीठ घालून कणिक भिजवा. .आणि 15 मी.बाजूला ठेवून द्या. .
  3. सारणासाठी. ...भिजवलेली डाळ घ्या. .
  4. पाणी नितरलयावर डाळ मिक्सर मधून वाटून घ्या. .
  5. नंतर आल लसूण हिरवी मिरची ची पेस्ट लाल तिखट गरम मसाला हळद मीठ हिंग ओवा जीरे पूड धने पुड घालून मिक्स करा..
  6. आता कूकर च्या डब्याला तेलाचा हात लावून मिश्रण त्यांत ओतून दया. ..शिट्टी काढून 15 मी.वाफवून घ्या. ..
  7. गार झाल्या वर त्यात खोबरे खीस भाजलेली खसखस कोथिंबीर लाल तिखट घालून चांगल मिक्स करून घ्या. .
  8. भिजवलेली कणिक च्या छोट्या पूरया लाटून त्यात सारण भरा आणि मोदकाचा आकार देवून ऊंबर फूलं बनवा. .चाळणीला तेलाचा हात लावून पॅन मध्ये पाणी घालून त्या वर चाळणी ठेवून झाकण लावून 15 मी.वाफवून घ्या. .
  9. त्या वर जीरे मोहरी ची फोडणी घाला. .
  10. आणि झणझणीत रस्सा सोबत सर्व्ह करा. ..

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर