चिरोटे | Chirote Recipe in Marathi

प्रेषक Aarya Paradkar  |  2nd Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Chirote recipe in Marathi,चिरोटे, Aarya Paradkar
चिरोटेby Aarya Paradkar
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  60

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

16

0

चिरोटे recipe

चिरोटे बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Chirote Recipe in Marathi )

 • २ वाटी मैदा
 • १ कप दूध
 • १ वाटी साखर
 • १/२चमचा वेलची पूड
 • चिमुटभर मीठ
 • २ चमचे तुपाचे मोहन
 • तळण्यासाठी तूप
 • फुड कलर रोज कलर, हिरवा कलर

चिरोटे | How to make Chirote Recipe in Marathi

 1. प्रथम मैद्यात तुपाचे मोहन व चिमूटभर मीठ घालून एकजीव करावे व
 2. नंतर त्याचे ३ भाग करणे
 3. एकात रोज व दुसऱ्यात हिरवा कलर व १ पांढरा भाग असे दूध घालून भिजवून गोळे बाजु १/२ ठेवणे
 4. नंतर साखर बुडेल इतके पाणी घालून एकतारी पाक करणे त्यात वेलची पूड घालावी
 5. नंतर ३ चमचे मैदा व तुप घालुन मऊशार फेतुन साटा तयार करणे
 6. पांढर्‍या गोळ्याचे व रोज कलरचे २-२ व हिरव्या गोळ्याची १ लाटी असे ५ भाग करणे
 7. प्रत्येक गोळ्यांचा जाड पोळ्या लाटून घेणे
 8. लाल पांढर्‍या लाटलेल्या पोळ्या मधे साटे लावून एका आड एक कलरची पोळी ठेवून घट्ट गुंडाळी करणे
 9. नंतर हिरव्या कलरच्या पोळीला साटे लावून वरील गुंडाळी ठेवून परत रोलकरणणे
 10. त्याचे सम भागात छोटे छोटे लाट्या करून कापलेली बाजु वर करून हलके हलके लाटणे लेअर येतील
 11. नंतर तूपात तळणे
 12. वरून वेलची पूड घालून केलेली पाठी साखर घालून किंवा पाकात बुडवून काढणे

My Tip:

मोहन तेलाचे किंवा तुपाचे ऐच्छिक

Reviews for Chirote Recipe in Marathi (0)