मुख्यपृष्ठ / पाककृती / गाकर सैंडविच

Photo of Gakar Sandwich by Vaishali Joshi at BetterButter
469
5
0.0(0)
0

गाकर सैंडविच

Jul-03-2018
Vaishali Joshi
10 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

गाकर सैंडविच कृती बद्दल

हे सैंडविच खुप पौष्टिक तर आहेच आणि कितीही वेळानंतर खाल्ले तरी गाकर छान खुसखुशीत रहातात, टिफिन मधे पण नेऊ शकतो .

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. जाड कणिक २ कप
  2. मीठ
  3. साजुक तूप ४-५ चमचे
  4. तेल
  5. आल लसूण पेस्ट १/२ चमचा
  6. मिर्चिचा ठेचा १/२ चमचा
  7. कांदा १
  8. उकडलेले बटाटे २
  9. चाट मसाला
  10. चीज क्यूब २
  11. टोमेटो सॉस

सूचना

  1. कणकेत ४-५ चमचे पातळ केलेले साजुक तुपाचे चे मोहन आणि मीठ घालून कणीक घट्ट भिजवून ठेवा
  2. उकडेलले बटाटे स्मैश करुन त्यात मिर्चिचा ठेचा , मीठ , तिखट , आल लसूण पेस्ट आणि कोथींबिर घालून एकत्र करा . हे आपल सारण तयार झाल .
  3. भिजवलेल्या कणकेच्या जाडसर पूरया लाटून मंद आचेवर तेल टाकुन भाजून घ्या अशा प्रकारे सगळ्या पिठाचे गाकर करून ठेवा
  4. एक गाकर घेवुन पहिले त्याला सॉस लावा नंतर सारण पसरवा , त्यावर बारीक़ चिरलेला कांदा , किसलेले चीज आणि वरून चाट मसाला टाका .त्यावर दुसरे गाकर ठेवून हलक्या हाताने प्रेस करून घ्या .झाले तयार गाकर सैंडविच .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर