व्हेज कोण | Veg kon Recipe in Marathi

प्रेषक priya Asawa  |  3rd Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Veg kon recipe in Marathi,व्हेज कोण, priya Asawa
व्हेज कोणby priya Asawa
 • तयारी साठी वेळ

  15

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  3

  माणसांसाठी

2

0

व्हेज कोण recipe

व्हेज कोण बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Veg kon Recipe in Marathi )

 • कोन साठी
 • 1 वाटी गव्हाचे पीठ
 • मीठ चवीनुसार
 • 1 चमचा गोड तेल मोहन साठी
 • ओवा 1 चमचा
 • सारण भरण्यासाठी
 • मोड आलेले मुग 1 1/2
 • कांदा बारीक चिरलेला 1/2 वाटी
 • टोमॅटो बारिक चिरलेला 1/2 वाटी
 • 1 चमचा लसूण पेस्ट
 • फोडणी साठी 1 चमचा
 • लाल तिखट 1 चमचा
 • हळद पाव चमचा
 • मीठ चवीनुसार
 • कोथिंबीर बारीक चिरलेली

व्हेज कोण | How to make Veg kon Recipe in Marathi

 1. कोन साठी लागणारे सर्व एकत्र करून पिठ मळून घ्या
 2. पिठ भिजत ठेवा
 3. सारण साठी एका कडाईत तेल गरम करायला ठेवा
 4. तेल गरम झाल्यावर कांदा लालसर भाजुन घ्या
 5. लसणाची पेस्ट टाकून थोडे भाजुन घ्या
 6. टोमॅटो टाकून परतुन घ्या
 7. व त्याच्यात मुग , लाल तिखट, हळद व मीठ घालून चांगले परतुन घ्या
 8. सारण थंड करायला ठेवा
 9. पिठाच्या पोळ्या लाटुन थोड्या भाजुन घ्या
 10. सर्व करताना थंड झालेल्या पोळी चे दोन भाग करा व त्याचे कोन करा
 11. तयार कोन तव्यावर तेल लावून मंद गॅसवर लालसर भाजुन घ्या
 12. त्याच्यामध्ये भाजी भरून घ्या व कोथिंबीर ने सजवून गरमागरम सर्व करा

My Tip:

यांच्यामध्ये तुम्ही चीज पण टाकु शकता

Reviews for Veg kon Recipe in Marathi (0)