532
1
4.0(0)
0

Shingada-Alu Vadi

Jul-03-2018
Snehal Chutke
30 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • पॅन फ्रायिंग
  • एअर फ्रायिंग
  • प्रेशर कूक
  • ग्रीलिंग
  • बेकिंग
  • स्टीमिंग
  • मायक्रोवेवींग
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 10 -12 अळूची ताजी पानं (काळ्या देठाची) मध्यम आकाराची
  2. 1 वाटी शिंगाडा पिठ
  3. 1/2 वाटी राजगिरा पिठ
  4. 1/2 वाटी चण्याचे पिठ
  5. 2 चमचे तांदळाचे पिठ
  6. 1 चमचा नाचणीचे पिठ (उपलब्ध असल्यास)
  7. धने पुड 1 चमचा
  8. जिरे पुड 1 चमचा
  9. तिखट 1 चमचा
  10. हिंग 1/4 चमचा
  11. हळद 1/4 चमचा
  12. ओवा 1 चमचा
  13. तिळ 1 चमचा
  14. मिठ चवीनुसार
  15. 1 चमचा चिंच / चिंचेचा कोळ
  16. गुळ 2 चमचे
  17. 1 चमचा आलं लसूण वाटण
  18. 1/2 कोथिंबीर वाटी बारीक चिरून
  19. 1/2 वाटी कांदा बारीक चिरुन
  20. गोडा मसाला 1/2 चमचा
  21. तेल 1 चमचा
  22. तळण्यासाठी/ शाॅलो फ्राय करण्यासाठी तेल
  23. पाणी अंदाजे 1 ते 1/2 वाटी

सूचना

  1. सर्व प्रथम अळु ची पाने स्वच्छ धुवुन घ्यायची, देठ कापुन वेगळे करायचे.. ही पाने एक एक उलटी पोलपाटावर किंवा सपाट जागेवर करून हलके दाब देऊन लाटणे फिरवायचे. म्हणेजे शिरा दबल्या जातात. एका बाजुला ठेऊन द्या.
  2. एका परसट भांड्यात सर्व प्रकारची पिठं एकत्र करून घ्या. त्यातत तेल व पाणी सोडुन सर्व साहित्य घालून एकत्र करून घ्या. त्यानंतर त्यात पाणी मिक्स करत हलवा साधारण इडली पीठ जसे घट्टसर असते तसे होईपर्यंत हलवा. पीठ तयार होईल.
  3. आता अळु ची पाने अर्ध्या संख्येने वेगळी करा म्हणजे 6-6, पहीले सर्वात मोठं पान घ्या. त्या पानावर पीठ लावा पान उलटे घ्यायचे म्हणजेच शीरांच्या भागावर पीठ लावायला घ्यायचे. एकावर एक असे ठेवायचे प्रत्येक पानाला पिठाचा लेअर लागला गेला पाहिजे. सर्व पानं लावुन झाल्यावर पानांच्या कडा आतील बाजूस घडी करुन घ्यायचा. नंतर वरील बाजु आणि खालील बाजु आत घडी करायच्या. शेवटी वरून खाली किंवा खालून वर घड्या घालत एक घडींची गुंडाळी तयार करायची. अशीच दुसरी गुंडाळीही बनवायची. दोन गुंडाळ्या तयार होतील.
  4. आता ह्या दोन्हीही गुंडाळ्यांना तेलाचा हात लावायचा आणि 15 ते 20 मिनिटं वाफवायच्या. वाफवल्यानंतर गार होऊन द्यायच्या. सुरीला तेल लावुन पातळ वड्या करून तेलात डीप फ्राय करा किंवा शाॅलो फ्राय करा, आणि गरमा गरम सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर