मुख्यपृष्ठ / पाककृती / उकडीचे मोदक

Photo of Ukadiche Modak by archana chaudhari at BetterButter
1123
1
0.0(0)
0

उकडीचे मोदक

Jul-03-2018
archana chaudhari
15 मिनिटे
तयारीची वेळ
45 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उकडीचे मोदक कृती बद्दल

गणपती बाप्पा आणि आपल्या सगळ्यांच्या आवडीचे

रेसपी टैग

  • कठीण
  • स्टीमिंग
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 6

  1. कव्हर साठी
  2. सुवासिक तांदूळ पीठ 2 वाट्या
  3. तूप 1/2 चमचा
  4. पाणी 2 वाट्या
  5. मीठ 2 चिमूट
  6. सारण
  7. खोबरे किस 2 वाट्या
  8. गूळ 1 आणि 1/2 वाटी
  9. खसखस 2 चमचे
  10. वेलची पूड 1 चमचे

सूचना

  1. कॉव्हरसाठी दिलेल्या पाण्याला उकळी आणा.
  2. आता पाण्यात तूप आणि मीठ घालून पीठ टाका.
  3. रवीने चांगले हलवून घ्या.
  4. गॅस बंद करून झाकण ठेवून 10 मिनिटे बाजूला ठेऊन द्या.
  5. सारणासाठी एका गरम पण मध्ये 3 लहान चमचे पाणी टाकून त्यात गुळ घाला.
  6. गूळ पूर्णपणे विताळल्यावर खोबऱ्याचा किस घाला.
  7. मिश्रण गोल्डन ब्राउन झाल्यावर खसखस आणि वेलचीपूड टाका सारण तयार आहे.
  8. आता तांदूळ पिठाचा उंडा तेल पाणी लावून चांगला मळून घ्या.
  9. सारण भरून व्यवस्थित बंद करा.हाताला तेल किंवा तूप लावा.
  10. या प्रमाणे सगळे मोदक बनवून घ्या.
  11. आता वाफावण्यासाठी पाणी गरम करायला ठेवा.
  12. मोदक वाफवायला ठेवण्याआधी ते पाण्यात बुडवून ठेवा.
  13. 15 ते 20 मिनिटे मोठया गॅस वर वाफवा.
  14. गरम गरम मोदक साजूक तूप घालून खा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर