सातकापे घावन | Saatkape Ghavan Recipe in Marathi

प्रेषक Deepa Gad  |  3rd Jul 2018  |  
5 from 1 review Rate It!
 • Saatkape Ghavan recipe in Marathi,सातकापे घावन, Deepa Gad
सातकापे घावनby Deepa Gad
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

4

1

सातकापे घावन recipe

सातकापे घावन बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Saatkape Ghavan Recipe in Marathi )

 • तांदळाचे पीठ १ मोठा बाऊल
 • मीठ चवीनुसार
 • ओले खोबरे १ वाटी
 • साखर १/२ वाटी
 • वेलचीपूड चिमूटभर
 • पाणी आवश्यकतेनुसार

सातकापे घावन | How to make Saatkape Ghavan Recipe in Marathi

 1. तांदळाच्या पिठात मीठ व थोडे थोडे पाणी घालून पातळ बॅटर बनवून घ्या
 2. ओले खोबरे, साखर, वेलचीपूड मिक्स करून ठेवा
 3. बीडे गॅसवर ठेवून तेल लावून घ्या
 4. गरम झाले की पेल्याने बिड्यावर बॅटर पातळसर टाका म्हणजे मस्त जाळी येईल
 5. शिजल की त्याच्या अर्ध्या भागावर थोडे खोबऱ्याचे सारण पसरा
 6. व दुसरी बाजू त्यावर दुमडा व रिकाम्या जागी तेल लावून तिथे बॅटर टाका त्या अर्ध्या भागावर.
 7. अर्ध्या भागावर बॅटर घातले ते शिजत आले की त्यावर खोबऱ्याचे सारण थोडे पसरा
 8. खोबऱ्याचे सारण पसरलेल्या भागावर दुसरा भाग फोल्ड करा
 9. परत राहिलेल्या भागावर तेल लावून बॅटर पसरा
 10. अशाप्रकारे सात वेळा फोल्ड करून हे सातकापे घावन तयार करा
 11. कापून सर्व्ह करा

My Tip:

सारण तुम्ही थोडं भाजूनही घेऊ शकता.

Reviews for Saatkape Ghavan Recipe in Marathi (1)

deepali oak4 months ago

Lovely
Reply