मुख्यपृष्ठ / पाककृती / Rajasthani Khooba Roti

Photo of Rajasthani Khooba Roti by Deepa Gad at BetterButter
0
8
5(1)
0

Rajasthani Khooba Roti

Jul-04-2018
Deepa Gad
0 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • इतर
 • राजस्थान
 • रोस्टिंग
 • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

 1. गव्हाचे पीठ १ कप
 2. ४-५ च तूप
 3. मीठ चवीनुसार
 4. कसुरी मेथी १ च
 5. रेड चिल्ली फ्लेक्स १ च
 6. पाणी आवश्यकतेनुसार

सूचना

 1. गव्हाच्या पिठात मीठ, चिल्ली फ्लेक्स, कसुरी मेथी, २ च तूप घालून हाताने व्यवस्थित एकजीव करा
 2. आवश्यकतेनुसार पाणी घालून घट्ट मळा व वरून गोळ्याला तूप लावून १० मिनिटे झाकून ठेवा
 3. मोठा गोळा म्हणजे २ चपात्या होतील एवढा गोळा घेऊन जाडसर २ इंचाची पोळी लाटा
 4. उलटी करून सुरीने त्याला अलगद टोचा मारा व कडेनेही गोलाकार टोचा मारा
 5. आता पोळी परत पलटी करून घ्या
 6. चिमट्याने त्याला दाबून चिमटा काढल्यासारखे वरचेवर करून डिझाईन बनवा, चिमटा नसेल तर हाताने चिमटा काढतो तसं गोलाकार करून घेणे
 7. नंतर गोलाकार कडा ही चिमट्याने दाबून घ्या व मध्यम गॅसवर तवा तापवून त्यावर अलगद टाका चिमट्याची डिझाईन वर येईल
 8. हाताने मध्ये मध्ये गोल फिरवत रहा चांगलीे भाजू द्या
 9. नंतरच पोळी उलटी करून भाजा अलगद फिरवत रहा, डिझाईन मोडणार नाही याची काळजी घ्या
 10. दुसरी बाजू भाजली की परत पलटी मारून डिझाईन असलेल्या बाजूवर तूप वरून सोडा आणि भाजा
 11. मस्त खुसखुशीत अशी ही खुबा रोटी कोणत्याही ग्रेव्ही असलेल्या भाजीबरोबर किंवा लोणच्याबरोबर सर्व्ह करा

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
deepali oak
Jul-04-2018
deepali oak   Jul-04-2018

Mastach

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर