काटोरी चाट | Katori chat Recipe in Marathi

प्रेषक Archana Chaudhari  |  4th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Katori chat recipe in Marathi,काटोरी चाट, Archana Chaudhari
काटोरी चाटby Archana Chaudhari
 • तयारी साठी वेळ

  20

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  8

  माणसांसाठी

2

0

काटोरी चाट recipe

काटोरी चाट बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Katori chat Recipe in Marathi )

 • काटोरी साठी
 • ज्वारीच्या लाह्या 1 वाटी
 • राजगिऱ्याच्या लाह्या 1 वाटी
 • पॉपकॉर्न च्या लाह्या 1 वाटी
 • बेसन पीठ 1/2 वाटी
 • तेल 1 चमचा
 • मीठ चवीनुसार
 • तेल तळण्यासाठी
 • चाट साठी
 • बटाटा उकडून बारीक कापलेला 1/2 वाटी
 • कांदा बारीक कापलेला 2 मोठे चमचे
 • मक्याचे दाणे उकडून घेतलेले 1/2 वाटी
 • चाट मसाला पावडर 1 चमचा
 • तिखट 1/4 चमचा
 • हिरवी मिरची 1 बारीक कापलेली
 • मीठ चवीनुसार
 • दही 1 वाटी
 • चिंच आणि खजुराची लाल चटणी 1/2वाटी
 • पुदिना आणि कोथिंबिरीची हिरवी चटणी 1/2 वाटी
 • शेव
 • डाळिंबाचे दाणे

काटोरी चाट | How to make Katori chat Recipe in Marathi

 1. लाह्या विकत नाही मिळाल्या तर घरीपण बनवू शकता,एक तापलेल्या जाड कढईत थोडीशी ,(1 चमचा) ज्वारी टाका आता मोठया गॅस वर पूर्णपणे लाह्या फुटू द्या.हालवत रहा.
 2. याचप्रमाणे मक्याचे आणि राजगिऱ्याच्या पण लाह्या बनवा.
 3. सगळ्या लाह्यांचे मिक्सरमध्ये पीठ बनवा.
 4. आता एका भांड्यात वाफिल पीठ, बेसन पीठ, तेल,मीठ टाकून घट्टसर पीठ भिजवा.
 5. वरील उंडयाचा एक गोळा घेऊन छोटीशी पिरी बनवा.
 6. ही पुरी वाटीच्या मागील बाजूस चिटकवा.
 7. आता कढईत तेल तापले की वरील वाटीसाकट तेलात तळून घ्या.
 8. चांगली कुरकुरीत झाल्यावर वाटी आपोआप वेगळी होईल, अश्या सगळ्या वाट्या तळुन घ्या.
 9. एका भांड्यात बटाटा,कांदा, मक्याचे दाणे,चाट मसाला,मीठ तिखट एकत्र करा.
 10. आता तळलेल्या काटोरी मध्ये वरील मिश्रण टाका.
 11. त्यावर दही,लाल चटणी,हिरवी चटणी टाका.
 12. शेव आणि डाळींबाच्या दाण्याने सजवा.

My Tip:

टोमॅटो, कोथिंबीर घालू शकता.

Reviews for Katori chat Recipe in Marathi (0)