मुख्यपृष्ठ / पाककृती / काटोरी चाट

Photo of Katori chat by archana chaudhari at BetterButter
600
2
0.0(0)
0

काटोरी चाट

Jul-04-2018
archana chaudhari
20 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
8 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

काटोरी चाट कृती बद्दल

काटोरी चाटचा वेगळा माझा इनोव्हेटिव्ह प्रकार...शिवाय हेल्दी पण...

रेसपी टैग

  • कठीण
  • फ्रायिंग
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 8

  1. काटोरी साठी
  2. ज्वारीच्या लाह्या 1 वाटी
  3. राजगिऱ्याच्या लाह्या 1 वाटी
  4. पॉपकॉर्न च्या लाह्या 1 वाटी
  5. बेसन पीठ 1/2 वाटी
  6. तेल 1 चमचा
  7. मीठ चवीनुसार
  8. तेल तळण्यासाठी
  9. चाट साठी
  10. बटाटा उकडून बारीक कापलेला 1/2 वाटी
  11. कांदा बारीक कापलेला 2 मोठे चमचे
  12. मक्याचे दाणे उकडून घेतलेले 1/2 वाटी
  13. चाट मसाला पावडर 1 चमचा
  14. तिखट 1/4 चमचा
  15. हिरवी मिरची 1 बारीक कापलेली
  16. मीठ चवीनुसार
  17. दही 1 वाटी
  18. चिंच आणि खजुराची लाल चटणी 1/2वाटी
  19. पुदिना आणि कोथिंबिरीची हिरवी चटणी 1/2 वाटी
  20. शेव
  21. डाळिंबाचे दाणे

सूचना

  1. लाह्या विकत नाही मिळाल्या तर घरीपण बनवू शकता,एक तापलेल्या जाड कढईत थोडीशी ,(1 चमचा) ज्वारी टाका आता मोठया गॅस वर पूर्णपणे लाह्या फुटू द्या.हालवत रहा.
  2. याचप्रमाणे मक्याचे आणि राजगिऱ्याच्या पण लाह्या बनवा.
  3. सगळ्या लाह्यांचे मिक्सरमध्ये पीठ बनवा.
  4. आता एका भांड्यात वाफिल पीठ, बेसन पीठ, तेल,मीठ टाकून घट्टसर पीठ भिजवा.
  5. वरील उंडयाचा एक गोळा घेऊन छोटीशी पिरी बनवा.
  6. ही पुरी वाटीच्या मागील बाजूस चिटकवा.
  7. आता कढईत तेल तापले की वरील वाटीसाकट तेलात तळून घ्या.
  8. चांगली कुरकुरीत झाल्यावर वाटी आपोआप वेगळी होईल, अश्या सगळ्या वाट्या तळुन घ्या.
  9. एका भांड्यात बटाटा,कांदा, मक्याचे दाणे,चाट मसाला,मीठ तिखट एकत्र करा.
  10. आता तळलेल्या काटोरी मध्ये वरील मिश्रण टाका.
  11. त्यावर दही,लाल चटणी,हिरवी चटणी टाका.
  12. शेव आणि डाळींबाच्या दाण्याने सजवा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर