कडबोळी | KADBOLI Recipe in Marathi

प्रेषक Minal Sardeshpande  |  4th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • KADBOLI recipe in Marathi,कडबोळी, Minal Sardeshpande
कडबोळीby Minal Sardeshpande
 • तयारी साठी वेळ

  75

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  66

  मि.
 • किती जणांसाठी

  6

  माणसांसाठी

2

0

कडबोळी recipe

कडबोळी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make KADBOLI Recipe in Marathi )

 • भाजणी साठी :एक की तांदूळ
 • अर्धा की चणाडाळ
 • पाव की उडीद
 • एक वाटी पोहे
 • एक वाटी साबुदाणा
 • पाव वाटी तूरडाळ
 • पाव वाटी नाचणी
 • पाव वाटी मसुरडाळ
 • पाव वाटी मूग
 • पाव वाटी ज्वारी
 • अर्धी वाटी धने
 • पाव वाटी जीरं
 • कडबोळी साठी: एक की तयार भाजणी
 • पाऊण ली पाणी
 • 150 मिली तेल
 • पाव वाटी ओवा
 • मीठ
 • हळद दोन टीस्पून
 • लाल तिखट चार टीस्पून
 • तेल तळणीसाठी

कडबोळी | How to make KADBOLI Recipe in Marathi

 1. भाजणीसाठी: तांदूळ धुवून वाळवून घ्यावेत.
 2. चणाडाळ, तांदूळ, उडीद, पोहे, साबुदाणा, नाचणी, तूरडाळ, मसुरडाळ, ज्वारी, मूग, धने, जीरं सर्व वेगवेगळं काळजीपूर्वक भाजून घ्यावे.
 3. एकत्र करून दळून आणावे.
 4. कडबोळी साठी: एक की भाजणी घ्यावी.
 5. ओवा मिक्सरला थोडा फिरवावा.
 6. पाऊण ली पाणी मोजून गरम करायला ठेवावे.
 7. पिठात तिखट, मीठ, हळद आणि ओवा मिसळून घ्यावा.
 8. 150 मिली तेल गरम करून पिठावर घालावे.
 9. गरम पाणी हळूहळू पिठात मिक्स करावे.
 10. सर्व मिश्रण एकत्र करून 15 मिनीटं झाकून ठेवावे.
 11. आता पीठ फूड प्रोसेसरला छान मळावे.
 12. लागल्यास पाणी घ्यावे.
 13. तयार पिठाचा लिंबाएवढा गोळा घ्यावा.
 14. ताटाच्या मागे तेल लावून त्यावर लांब वळावे.
 15. आता चकलीसारखे गुंडाळून टोक बंद करावे.
 16. तयार करून घेतलेली कडबोळी
 17. तेल तापत ठेवावे.
 18. कडकडीत तापले की आच मध्यम ठेवून कडबोळी कुरकुरीत तळावीत.
 19. हवाबंद डब्यात ठेवावीत.
 20. तयार कडबोळी
 21. भाजणी पेरून पडवळ, मेथी, अळूची भाजी पण छान होते.

My Tip:

या भाजणीचे वडे किंवा थालीपीठ पण छान लागते, अनेक डाळी, धान्य एकदम पोटात जातात.

Reviews for KADBOLI Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo

ह्या सारख्या दुसऱ्या पाककृती