डिफ्रन्ट आळुवडी | Different aaluvadi Recipe in Marathi

प्रेषक Teesha Vanikar  |  4th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Different aaluvadi recipe in Marathi,डिफ्रन्ट आळुवडी, Teesha Vanikar
डिफ्रन्ट आळुवडीby Teesha Vanikar
 • तयारी साठी वेळ

  20

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  40

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

2

0

डिफ्रन्ट आळुवडी recipe

डिफ्रन्ट आळुवडी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Different aaluvadi Recipe in Marathi )

 • 5ते 6आळुची पाने
 • 1वाटी बेसन
 • 1/2 वाटी ज्वारीचे पिठ
 • चिंचेचा कोळ
 • 1चमचा ओवा
 • 1चमचा लाल तिखट
 • 1चमचा गरम मसाला
 • 1/2चमचा हळद
 • गुळ
 • तीळ
 • मीठ
 • वाटणासाठी-
 • 4चमचे खोबर्याचा किस
 • 1कांदा
 • 5 लसुण पाकळ्या
 • अद्रक
 • कोथिंम्बीर
 • 2हिरव्या मिरच्या

डिफ्रन्ट आळुवडी | How to make Different aaluvadi Recipe in Marathi

 1. प्रथम दोन्ही पिठं ऐकत्र करुन भाजुन घेतले
 2. खोबरं व कांदा भाजुन,कोथिंम्बीर व मिरच्या,आलं लसुण घालुन वाटुन घेतले
 3. भाजलेल्या पिठात तयार वाटण,गुळ,चिंच,ओवा,सुखे मसाले,मीठ घातले,
 4. आता त्यात थोडं पाणी घालुन पीठ घट्ट भिजवुन घेतले
 5. आळु स्वच्छ करुन , लाटण्याने लाटुन शिरा ठेचुन घेतले
 6. आळुची शीर्याची बाजु पालथी करून तयार पिठ जाडसर लावले
 7. पुन्हा त्याच पानावर दुसरे आळुचे पान ठेवुन त्यावर जाडसर पीठ लावले
 8. ह्याचप्रमाणे ऊरलेली 3 ही पाने ऐकावर ऐक ठेवुन पिठ लावले
 9. नंतर आळुच्या पानाचा घट्ट रोल बनवला
 10. तयार रोल 15 मिनीटे वाफवुन घेतला
 11. वाफवल्या नंतर रोल 10/15 मिनीटे फ्रिजमध्ये ठेवला
 12. नंतर रोलच्या वड्या कापुन घेतल्या
 13. नाँनस्टिक पँनमध्ये 2चमचे तेल घेवुन त्यात तीळ घातली
 14. कापलेल्या वड्या नाँनस्टिक पँनमध्ये शँलो फ्राय केल्या
 15. तयार वड्या साँस सोबत सर्व्ह केल्या

My Tip:

रोल सुटू नये म्हणुन दोर्याने बाधुंन घ्यावा.

Reviews for Different aaluvadi Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo

ह्या सारख्या दुसऱ्या पाककृती