मेतकूट: मॅजिक टेस्ट | METKUT Recipe in Marathi

प्रेषक Minal Sardeshpande  |  5th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • METKUT recipe in Marathi,मेतकूट: मॅजिक टेस्ट, Minal Sardeshpande
मेतकूट: मॅजिक टेस्टby Minal Sardeshpande
  • तयारी साठी वेळ

    60

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    15

    मि.
  • किती जणांसाठी

    10

    माणसांसाठी

16

0

मेतकूट: मॅजिक टेस्ट recipe

मेतकूट: मॅजिक टेस्ट बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make METKUT Recipe in Marathi )

  • चणाडाळ पाव की
  • उडीद डाळ पाव की
  • हिरवा वाटाणा पाव की
  • तांदूळ 100 ग्रॅम
  • गहू 100 ग्रॅम
  • धने अर्धी वाटी
  • जीरं अर्धी वाटी
  • सुंठ पावडर दीड चमचा
  • हिंग एक चमचा
  • मोहोरी दीड चमचा
  • मेथी दीड चमचा
  • तिखट एक चमचा
  • हळद एक चमचा

मेतकूट: मॅजिक टेस्ट | How to make METKUT Recipe in Marathi

  1. चणा डाळ, उडीद डाळ, हिरवा वाटाणा, गहू,तांदूळ, मेथी, धने, जीरं वेगवेगळं खमंग भाजून घ्या.
  2. गॅस बंद करून गरम कढईत मोहोरी परतून घ्या.
  3. भाजून तयार
  4. सर्व एकत्र करून बारीक दळून आणा.
  5. दळलेल्या पिठात हळद पावडर, सुंठ पावडर, हिंग पावडर, तिखट हेसर्व नीट मिक्स करा.
  6. तयार मेतकूट घट्ट झाकणाच्या बरणीत भरून ठेवा.
  7. तयार मेतकूट
  8. हे मेतकूट नुसते दह्यात कालवून किंवा तोंडली, पडवळ, दुधी, पडवळ बिया हे वाफवून, कांदा घालून दह्यातील भरीत करताना मेतकूट घालून मस्त लागते.
  9. पडवळाचे भरीत मेतकूट घालून
  10. सकाळी मऊभातात तूप मेतकूट घालून अप्रतिम लागते.
  11. भडंग करताना तेलात तिखट मीठ आणि मेतकूट कालवून लावून चुरमुरे फोडणीत परता मस्त चव येते.
  12. भडंग

My Tip:

मुलांना नुसते पोळीला तूप मेतकूट लावून रोलही देऊ शकता.

Reviews for METKUT Recipe in Marathi (0)