थालीपीठ भाजणी पिठाचे टॅकोज | Thalipith bhajni flour tacos Recipe in Marathi

प्रेषक Archana Chaudhari  |  5th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Thalipith bhajni flour tacos recipe in Marathi,थालीपीठ भाजणी पिठाचे टॅकोज, Archana Chaudhari
थालीपीठ भाजणी पिठाचे टॅकोजby Archana Chaudhari
 • तयारी साठी वेळ

  15

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  6

  माणसांसाठी

2

0

About Thalipith bhajni flour tacos Recipe in Marathi

थालीपीठ भाजणी पिठाचे टॅकोज recipe

थालीपीठ भाजणी पिठाचे टॅकोज बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Thalipith bhajni flour tacos Recipe in Marathi )

 • थालीपीठ भाजणी(बाजरी 1किलो, ज्वारी 1/2किलो,250 ग्रॅमतांदूळ,गहू 1 वाटी,पोहे 2 वाट्या, मूग ,मटकी, छोले ,हरभरे ,चवळी सगळे प्रत्येकी 1 वाटी,तूर डाळ, मटकी,हरभरा डाळ सगळे प्रत्येकी 1 वाटी,धणे 1 वाटी,जिरे 1/2वाटी सगळे बाजून दळून आणा.) पीठ 2 वाट्या
 • तिखट 2 चमचे
 • मीठ चवीनुसार
 • तेल 2 चमचे आणि वरून लावण्यासाठी 2 चमचे
 • भरण्यासाठी
 • मोड आलेले मूग 1 वाटी थोडे उकडून घेतलेले
 • कांदा 1 बारीक चिरलेला
 • टोमॅटो 1 बारीक चिरलेला
 • कोथिंबीर 2 चमचे बारीक चिरलेली
 • काकडी 1/2 बारीक चिरलेली
 • हिरवी मिरची 1 बारीक चिरलेली
 • चाट मसाला 1 चमचा
 • हिरवी पुदिना चटणी 1 चमचा
 • टोमॅटो केचप (चिंचेची चटणी) 1 चमचा
 • दही 1/2 वाटी घट्ट
 • बारीक शेव 2 चमचे

थालीपीठ भाजणी पिठाचे टॅकोज | How to make Thalipith bhajni flour tacos Recipe in Marathi

 1. थालीपीठ भाजणीच्या पिठात तिखट,तेल,मीठ टाकून पाण्याने घट्टसर भिजवून घ्या.
 2. ह्या भिजवलेल्या गोळ्यामधून छोटा गोळा घेऊन तो लाटून घ्या.
 3. छोट्या वाटीने लहान पुऱ्या बनून घ्या.त्यांना काट्याने टोचे मारा.
 4. ह्या टोचे मारलेल्या पुऱ्या रोटी मेकर मध्ये ठेवून तेल लावून भाजून घ्या.
 5. भाजल्यावर लगेचच कापडावर ठेऊन पुरी मध्ये लाटणं ठेऊन दाब द्या.
 6. याप्रमाणे सगळे टॅकोज बनवून घ्या.
 7. आता हे टॅकोज प्लेट मध्ये ठेऊन त्यात मूग,कांदा, टोमॅटो, काकडी,मिरची, कोथिंबीर टाका.
 8. वर दही,हिरवी चटणी, लाल चटणी,बारीक शेव टाका. :blush:
 9. वरून चाट मसाला भुरभुरा....

My Tip:

मक्याचे दाणे घेऊ शकता.

Reviews for Thalipith bhajni flour tacos Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo