मुख्यपृष्ठ / पाककृती / थालीपीठ भाजणी पिठाचे टॅकोज

Photo of Thalipith bhajni flour tacos by Archana Chaudhari at BetterButter
1
4
0(0)
0

थालीपीठ भाजणी पिठाचे टॅकोज

Jul-05-2018
Archana Chaudhari
15 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

थालीपीठ भाजणी पिठाचे टॅकोज कृती बद्दल

खूप छान लागणारे वेगळे टॅकोज....माझं इंनोवेशन

रेसपी टैग

  • कठीण
  • फ्युजन
  • अॅपिटायजर
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 6

  1. थालीपीठ भाजणी(बाजरी 1किलो, ज्वारी 1/2किलो,250 ग्रॅमतांदूळ,गहू 1 वाटी,पोहे 2 वाट्या, मूग ,मटकी, छोले ,हरभरे ,चवळी सगळे प्रत्येकी 1 वाटी,तूर डाळ, मटकी,हरभरा डाळ सगळे प्रत्येकी 1 वाटी,धणे 1 वाटी,जिरे 1/2वाटी सगळे बाजून दळून आणा.) पीठ 2 वाट्या
  2. तिखट 2 चमचे
  3. मीठ चवीनुसार
  4. तेल 2 चमचे आणि वरून लावण्यासाठी 2 चमचे
  5. भरण्यासाठी
  6. मोड आलेले मूग 1 वाटी थोडे उकडून घेतलेले
  7. कांदा 1 बारीक चिरलेला
  8. टोमॅटो 1 बारीक चिरलेला
  9. कोथिंबीर 2 चमचे बारीक चिरलेली
  10. काकडी 1/2 बारीक चिरलेली
  11. हिरवी मिरची 1 बारीक चिरलेली
  12. चाट मसाला 1 चमचा
  13. हिरवी पुदिना चटणी 1 चमचा
  14. टोमॅटो केचप (चिंचेची चटणी) 1 चमचा
  15. दही 1/2 वाटी घट्ट
  16. बारीक शेव 2 चमचे

सूचना

  1. थालीपीठ भाजणीच्या पिठात तिखट,तेल,मीठ टाकून पाण्याने घट्टसर भिजवून घ्या.
  2. ह्या भिजवलेल्या गोळ्यामधून छोटा गोळा घेऊन तो लाटून घ्या.
  3. छोट्या वाटीने लहान पुऱ्या बनून घ्या.त्यांना काट्याने टोचे मारा.
  4. ह्या टोचे मारलेल्या पुऱ्या रोटी मेकर मध्ये ठेवून तेल लावून भाजून घ्या.
  5. भाजल्यावर लगेचच कापडावर ठेऊन पुरी मध्ये लाटणं ठेऊन दाब द्या.
  6. याप्रमाणे सगळे टॅकोज बनवून घ्या.
  7. आता हे टॅकोज प्लेट मध्ये ठेऊन त्यात मूग,कांदा, टोमॅटो, काकडी,मिरची, कोथिंबीर टाका.
  8. वर दही,हिरवी चटणी, लाल चटणी,बारीक शेव टाका.:blush:
  9. वरून चाट मसाला भुरभुरा....

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर