Photo of Dal dhokli by archana chaudhari at BetterButter
660
2
0.0(0)
0

दाल ढोकली

Jul-06-2018
archana chaudhari
10 मिनिटे
तयारीची वेळ
45 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

दाल ढोकली कृती बद्दल

दाल ढोकली हा एक पारंपरिक गुजराती पदार्थ आहे. मी इथे थोडी वेगळ्या पद्धतीने बनविला आहे.

रेसपी टैग

  • मध्यम
  • बॉइलिंग
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 6

  1. गहू पीठ ३वाट्या
  2. बेसन पीठ १ वाटी
  3. बेकिंग पावडर १/४ चमचा
  4. मीठ चवीनुसार
  5. तेल ३ चमचे
  6. गाजर उकडून पेस्ट करून १ वाटी
  7. पालक उकडून पेस्ट करून १ वाटी
  8. बिट उकडून पेस्ट करून १ वाटी
  9. तूरडाळ शिजवून घेतलेली २ वाट्या
  10. तिखट १ चमचा
  11. मीठ चवीनुसार
  12. जिरे १/२ चमचा
  13. मोहरी १/२ चमचा
  14. हिंग १/४ चमचा
  15. कढीपत्ता पाने ४
  16. चिंच कोळ २ चमचे
  17. गूळ २ चमचे
  18. तेल २ चमचे

सूचना

  1. सगळे पीठे ,मीठ,बेकिंग पावडर, तेल एकत्र करून,३ सारखे भाग करा.
  2. गाजराची पेस्ट एका भागात, पालकाची पेस्ट दुसऱ्या भागात आणि बीट रूट ची पेस्ट तिसऱ्या भागात टाका.
  3. चांगले मळून घेतल्यावर तिन्ही गोळे एका डब्यात १० मिनिटे झाकून ठेवा.
  4. आता प्रत्येकाची वेगळी अश्या ३ पोळ्या लाटा, आणि सुरीने चौकोनी कापून घ्या.
  5. कढईत तेल टाकून तापल्यावर जिरे,मोहरी,हिंग,कढीपत्ता टाका.
  6. शिजवलेली तुरीची डाळ टाका.
  7. तिखट,मीठ,चिंच कोळ टाका.
  8. शेवटी गूळ टाका
  9. चांगली उकळी आली की वरील कापलेले चौकोनी तुकडे टाका.
  10. ३ ग्लास गरम पाणी टाकून २० मिनिटे उकळू द्या.
  11. गरम गरम खा तूप टाकून:blush:

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर