वरणफळ | Varanfal Recipe in Marathi

प्रेषक Bharti Kharote  |  6th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Varanfal recipe in Marathi,वरणफळ, Bharti Kharote
वरणफळby Bharti Kharote
 • तयारी साठी वेळ

  15

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

4

0

वरणफळ recipe

वरणफळ बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Varanfal Recipe in Marathi )

 • एक वाटी तुरडाळ शिजवलेली
 • वरणासाठी--4/5 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेली
 • 4/5 लसूण पाकळ्या
 • जीरे मोहरी एक टीस्पून
 • मेथी दाणे एक टीस्पून
 • हिंग हळद पाव चमचा
 • अर्धीवाटी कोथिंबीर बारीक चिरलेली
 • चिंच 2/3 बुटुक
 • एक टेबलस्पून गुळ
 • चवीनुसार मीठ
 • फळासाठी-- गव्हाचे पीठ दोन वाट्या
 • ओवा पाव चमचा
 • जीरे पूड धने पुड
 • तेल दोन चमचे
 • चवीनुसार मीठ
 • पाणी आवश्यकतेनुसार
 • साजूक तूप दोन चमचे

वरणफळ | How to make Varanfal Recipe in Marathi

 1. कुकर मध्ये तुरडाळ लावून 5 शिट्ट्या करून शिजवून घ्या.
 2. तोपर्यंत कणिक भिजवा. .
 3. एका वाडग्यात गव्हाचे पीठ घेऊन त्यात ओवा जीरे पूड धने पुड मीठ घालून चांगल मळून घ्या. .
 4. तेल लावून परत मळा. .आणि बाजूला ठेवा. .
 5. आता गॅस वर पातेले ठेवा तेल टाकून जीरे मोहरी लसूण हिरव्या मिरच्या हिंग हळद घालून कडकडीत फोडणी दया. .
 6. डाळ पळीने ठेचून पातळ करून घ्या. .
 7. फोडणी मध्ये तुरडाळ घाला. .चिंच आणि गुळ घाला. .
 8. आवश्यकतेनुसार पाणि घाला. .
 9. आणि मंद आचे वर वरण उकळू दया
 10. आता कणिकेची पोळी लाटून चाकू ने चौकोनी फळ कापून घ्या. .
 11. ऊकळी आल्या वर त्यात हे फळ सोडा. ..आणि 15 मी...चांगल शिजू दया. ..
 12. वरतून कोथिंबीर आणि साजूक तुपाची धार घालून गरम गरम सर्व करा. .

My Tip:

वरणफळात आवडीनुसार तुम्ही लाल तिखट पण घालू शकता. .

Reviews for Varanfal Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo

ह्या सारख्या दुसऱ्या पाककृती