गव्हाचा व ज्वारीचा पिठाचे धिरडे | Veg chilla Recipe in Marathi

प्रेषक priya Asawa  |  6th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Veg chilla recipe in Marathi,गव्हाचा व ज्वारीचा पिठाचे धिरडे, priya Asawa
गव्हाचा व ज्वारीचा पिठाचे धिरडेby priya Asawa
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

1

0

गव्हाचा व ज्वारीचा पिठाचे धिरडे recipe

गव्हाचा व ज्वारीचा पिठाचे धिरडे बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Veg chilla Recipe in Marathi )

 • 1 वाटी गव्हाचे पीठ
 • 1 वाटी ज्वारीचे पीठ
 • लसणाची 5-7 पाखळया
 • आल्य 1 चमचा किसलेला
 • 3 चमचे कोथिंबीर बारीक चिरलेली
 • लाल तिखट 1 छोटा चम्मचा
 • हळद पाव चमचा
 • जीरा ओवा पावडर 1 चम्मचा
 • मीठ चवीनुसार
 • गोडतेल धिरडे भाजण्यासाठी
 • चिमूटभर खाण्याचा सोडा
 • पानी घोळ बनवण्यासाठी

गव्हाचा व ज्वारीचा पिठाचे धिरडे | How to make Veg chilla Recipe in Marathi

 1. प्रथम लसूण, आल् व 2 चमचे कोथिंबीर मिक्सर मधुन एकजीव काढून घ्या
 2. एका पातेल्यात गव्हाचे पीठ व ज्वारीचे पीठ घ्या
 3. त्याच्यात लसूण,आल् व कोथिंबीर ची पेस्ट , लाल तिखट, हळद, जीरे ओवा पावडर, सोडा, मीठ व पाणी टाकून चांगल्या प्रकारे मिक्स करावे व मध्यम घोळ तयार करावा
 4. नाॅन स्टिक तव्यावर घोळ टाकून चमचा ने गोल पसरुन घ्या धिरडया च्या सगळ्या बाजूने तेल सोडून गॅसच्या मध्यम आचेवर धिरडे दोन्ही बाजूनी खरपूस भाजून घ्या
 5. गरम गरम धिरडे कोथिंबीर ची चटणी किंवा साॅस बरोबर सर्व करा

My Tip:

धिरडयावर तूम्ही बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, पालक व चीज टाकून पण बनवु शकता

Reviews for Veg chilla Recipe in Marathi (0)