हिरव्या मसाल्याचे पिठले आणि बाजरीची भाकरी | Green masala Pithala with Bajri bhakri Recipe in Marathi

प्रेषक Archana Chaudhari  |  6th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Green masala Pithala with Bajri bhakri recipe in Marathi,हिरव्या मसाल्याचे पिठले आणि बाजरीची भाकरी, Archana Chaudhari
हिरव्या मसाल्याचे पिठले आणि बाजरीची भाकरीby Archana Chaudhari
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  3

  माणसांसाठी

2

0

About Green masala Pithala with Bajri bhakri Recipe in Marathi

हिरव्या मसाल्याचे पिठले आणि बाजरीची भाकरी recipe

हिरव्या मसाल्याचे पिठले आणि बाजरीची भाकरी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Green masala Pithala with Bajri bhakri Recipe in Marathi )

 • हिरवा मसाला पिठल्यासाठी
 • बेसन पीठ जाडसर १ वाटी
 • तेल १ मोठा चमचा
 • जिरे १/२ चमचा
 • मोहरी १/२ चमचा
 • कांदे २ मध्यम बारीक चिरलेले
 • हळद १/२ चमचा
 • तिखट १/२ चमचा
 • मीठ चवीनुसार
 • हिरवा मसाला
 • कोथिंबीर १/२ वाटी
 • लसूण पाकळ्या ८
 • जिरे १ चमचा
 • हिरव्या मिरच्या ३
 • बाजरीच्या भाकरीसाठी
 • बाजरीचे पीठ २ वाट्या
 • मीठ चवीनुसार

हिरव्या मसाल्याचे पिठले आणि बाजरीची भाकरी | How to make Green masala Pithala with Bajri bhakri Recipe in Marathi

 1. हिरव्या मसाल्याचे साहित्य मिक्सरमधून बारीक वाटून घ्या.
 2. कढईत तेल तापल्यावर जिरे,मोहरीची फोडणी करून कांदा चांगला परता.
 3. त्यात हळद ,तिखट,वाटलेला हिरवा मसाला परता.
 4. २ ग्लास गरम पाणी आणि मीठ घाला.
 5. उकळी आली की बेसन पीठ एका हाताने आणि दुसऱ्या हाताने चमच्याने पटापट ढवळा.
 6. एकजीव झाल्यावर झाकण ठेवून १० मिनिटे मंद आचेवर ठेवा.
 7. भाकरीसाठी बाजरीच्या पिठात मीठ आणि कोमट पाणी टाकून मऊ गोळा होईपर्यंत मळून घ्या.४ गोळे बनवून ठेवा.
 8. तवा तापायला ठेवा.
 9. परातीत थोडेसे पीठ भुरभुरावे त्यावर पिठाचा गोळा थापावा... पोळीपेक्षा जाडसर असू द्यावा.
 10. आता पिठाची बाजू तव्याच्या वरच्या बाजूने ठेवावी व वरून थोडेसे पाणी टाकून फिरवावे.
 11. वरून भाकरी कोरडी दिसू लागते तेव्हा तिला उलटी करावी.
 12. आता भाकरी तव्यावरून काढावी आणि पहिली बाजू मोठया आचेवर शेकून घ्यावी.
 13. गरम गरम हिरव्या मसाल्याचे पिठले आणि भाकरी खावी.... :blush:

My Tip:

वरून शेंगदाण्याचे तेल घालून खा.

Reviews for Green masala Pithala with Bajri bhakri Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo

ह्या सारख्या दुसऱ्या पाककृती