BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / हिरव्या मसाल्याचे पिठले आणि बाजरीची भाकरी

Photo of Green masala Pithala with Bajri bhakri by Archana Chaudhari at BetterButter
0
3
0(0)
0

हिरव्या मसाल्याचे पिठले आणि बाजरीची भाकरी

Jul-06-2018
Archana Chaudhari
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

हिरव्या मसाल्याचे पिठले आणि बाजरीची भाकरी कृती बद्दल

नेहमीच्या पिठल्यापेक्षा वेगळ्या आणि छान चवीची पाककृती....

रेसपी टैग

  • सोपी
  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. हिरवा मसाला पिठल्यासाठी
  2. बेसन पीठ जाडसर १ वाटी
  3. तेल १ मोठा चमचा
  4. जिरे १/२ चमचा
  5. मोहरी १/२ चमचा
  6. कांदे २ मध्यम बारीक चिरलेले
  7. हळद १/२ चमचा
  8. तिखट १/२ चमचा
  9. मीठ चवीनुसार
  10. हिरवा मसाला
  11. कोथिंबीर १/२ वाटी
  12. लसूण पाकळ्या ८
  13. जिरे १ चमचा
  14. हिरव्या मिरच्या ३
  15. बाजरीच्या भाकरीसाठी
  16. बाजरीचे पीठ २ वाट्या
  17. मीठ चवीनुसार

सूचना

  1. हिरव्या मसाल्याचे साहित्य मिक्सरमधून बारीक वाटून घ्या.
  2. कढईत तेल तापल्यावर जिरे,मोहरीची फोडणी करून कांदा चांगला परता.
  3. त्यात हळद ,तिखट,वाटलेला हिरवा मसाला परता.
  4. २ ग्लास गरम पाणी आणि मीठ घाला.
  5. उकळी आली की बेसन पीठ एका हाताने आणि दुसऱ्या हाताने चमच्याने पटापट ढवळा.
  6. एकजीव झाल्यावर झाकण ठेवून १० मिनिटे मंद आचेवर ठेवा.
  7. भाकरीसाठी बाजरीच्या पिठात मीठ आणि कोमट पाणी टाकून मऊ गोळा होईपर्यंत मळून घ्या.४ गोळे बनवून ठेवा.
  8. तवा तापायला ठेवा.
  9. परातीत थोडेसे पीठ भुरभुरावे त्यावर पिठाचा गोळा थापावा... पोळीपेक्षा जाडसर असू द्यावा.
  10. आता पिठाची बाजू तव्याच्या वरच्या बाजूने ठेवावी व वरून थोडेसे पाणी टाकून फिरवावे.
  11. वरून भाकरी कोरडी दिसू लागते तेव्हा तिला उलटी करावी.
  12. आता भाकरी तव्यावरून काढावी आणि पहिली बाजू मोठया आचेवर शेकून घ्यावी.
  13. गरम गरम हिरव्या मसाल्याचे पिठले आणि भाकरी खावी....:blush:

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर