धिरडयाचे रायता | Chilla rayta Recipe in Marathi

प्रेषक priya Asawa  |  7th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Chilla rayta recipe in Marathi,धिरडयाचे रायता, priya Asawa
धिरडयाचे रायताby priya Asawa
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  5

  माणसांसाठी

2

0

धिरडयाचे रायता recipe

धिरडयाचे रायता बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Chilla rayta Recipe in Marathi )

 • ताक 4/5 वाटी
 • लाल सुकलेल्या आख्या 3 मिरच्या
 • तयार थंडे झालेले 4/5 धिरडयाचे तूकडे( धिरडया ची रेसिपी मी कालच शेअर केलेली आहे )
 • कोथिंबीर बारीक चिरलेली 1 चमचा
 • जीरा पावडर 1 चमचा
 • चाट मसाला चवीनुसार
 • मीठ व साखर चवीनुसार
 • तेल, जिरे, मोहरी व हिंग, कढीपत्ता फोडणी साठी

धिरडयाचे रायता | How to make Chilla rayta Recipe in Marathi

 1. एका बाऊल मध्ये ताक घ्या
 2. ताका मध्ये मीठ , साखर व चाट मसाला चवीनुसार टाकून चांगले मिक्स करून घ्या आता धिरडयाचे तूकडे घालून मिक्स करून घ्या
 3. एका कडाईत तेल फोडणी साठी ठेवा ते गरम झाले कि मोहरी, जीरे, हिंग, कढीपत्ता व सुक्या लाल मिरच्या टाकून फोडणी द्या
 4. ताकाच्या बाउल मध्ये वरुन फोडणी टाका व फ्रिज मध्ये ठंड करायला ठेवा
 5. ठंड झाल्यावर चिरलेली कोथिंबीर टाकून सर्व करा

My Tip:

ताक फार पातळ घेउ नये

Reviews for Chilla rayta Recipe in Marathi (0)