मेथी गव्हाचे लाडु | Methi wheat Ladu Recipe in Marathi

प्रेषक दिपाली सावंत  |  7th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Methi wheat Ladu recipe in Marathi,मेथी गव्हाचे लाडु, दिपाली सावंत
मेथी गव्हाचे लाडुby दिपाली सावंत
 • तयारी साठी वेळ

  2

  तास
 • बनवण्यासाठी वेळ

  0

  मि.
 • किती जणांसाठी

  10

  माणसांसाठी

3

0

मेथी गव्हाचे लाडु recipe

मेथी गव्हाचे लाडु बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Methi wheat Ladu Recipe in Marathi )

 • १ किलो गहू भाजून फुलवून पिठ केलेले
 • १५० GM मेथी दाणे भाजून पिठ केलेले
 • पाव किलो मुग डाळ भाजून पिठ केलेले
 • १००gm बदाम
 • १००gm काजू
 • २५०gm सुके खोबरे कीसलेल
 • २५०gm खजूर
 • २५० gm डिंक
 • १०० gm हलिम
 • १०० gm खसखस
 • १ १/४ kg गुळ किसलेला
 • १० gm वेलची पुड
 • १ kg तूप

मेथी गव्हाचे लाडु | How to make Methi wheat Ladu Recipe in Marathi

 1. भाजलेले गहू, मूग डाळ व मेथी दाणे एकत्र दळून पिठ करून आणले
 2. एका कढईत बदाम, काजु, सुकं खोबरं, खारिक, हलिम, खसखस भाजून घ्या व एक एक करून सर्व जिन्नस मिक्सर मध्ये वाटुन घ्या खसखस व थोडं हलिम मिक्सर ला नका लावू,
 3. एका कढईत तूप गरम करून त्यात थोडे थोडे करून सर्व डिंक तळुन घ्या
 4. टोपात थोडे तूप गरम करून त्यात पिठ खमंग खरपूस भाजुन घ्या 4 ते 5 batch मधे भाजा, सर्व एकत्र भाजू नका
 5. सर्व एकत्र करून चांगले मिक्स करा व वेलचीपूड ही मिक्स करा
 6. टोपात 2-3 वाटी तूप व चिरलेला गुळ गरम करून वितळवून घ्या, व लाडूचे मिश्रण एकजीव करून लाडु वळवून घ्या , हे पण 3 batch मधे करा

My Tip:

प्रमाण ratio कमी करू शकता,

Reviews for Methi wheat Ladu Recipe in Marathi (0)