मुख्यपृष्ठ / पाककृती / मेथी गव्हाचे लाडु

Photo of Methi wheat Ladu by Deepali Sawant at BetterButter
799
2
0.0(0)
0

मेथी गव्हाचे लाडु

Jul-07-2018
Deepali Sawant
120 मिनिटे
तयारीची वेळ
0 मिनिटे
कूक वेळ
10 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मेथी गव्हाचे लाडु कृती बद्दल

मेथी, गहू व मुग डाळ या पिठापासून बनवलेले लाडु

रेसपी टैग

  • मध्यम
  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 10

  1. १ किलो गहू भाजून फुलवून पिठ केलेले
  2. १५० GM मेथी दाणे भाजून पिठ केलेले
  3. पाव किलो मुग डाळ भाजून पिठ केलेले
  4. १००gm बदाम
  5. १००gm काजू
  6. २५०gm सुके खोबरे कीसलेल
  7. २५०gm खजूर
  8. २५० gm डिंक
  9. १०० gm हलिम
  10. १०० gm खसखस
  11. १ १/४ kg गुळ किसलेला
  12. १० gm वेलची पुड
  13. १ kg तूप

सूचना

  1. भाजलेले गहू, मूग डाळ व मेथी दाणे एकत्र दळून पिठ करून आणले
  2. एका कढईत बदाम, काजु, सुकं खोबरं, खारिक, हलिम, खसखस भाजून घ्या व एक एक करून सर्व जिन्नस मिक्सर मध्ये वाटुन घ्या खसखस व थोडं हलिम मिक्सर ला नका लावू,
  3. एका कढईत तूप गरम करून त्यात थोडे थोडे करून सर्व डिंक तळुन घ्या
  4. टोपात थोडे तूप गरम करून त्यात पिठ खमंग खरपूस भाजुन घ्या 4 ते 5 batch मधे भाजा, सर्व एकत्र भाजू नका
  5. सर्व एकत्र करून चांगले मिक्स करा व वेलचीपूड ही मिक्स करा
  6. टोपात 2-3 वाटी तूप व चिरलेला गुळ गरम करून वितळवून घ्या, व लाडूचे मिश्रण एकजीव करून लाडु वळवून घ्या , हे पण 3 batch मधे करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर