खजुरी मका कणिक शालोफ्राइड बिस्किट | Khajuri Corn and Wheat Shallow fried Biscuits Recipe in Marathi

प्रेषक Vaishali Joshi  |  8th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Khajuri Corn and Wheat Shallow fried Biscuits recipe in Marathi,खजुरी मका कणिक शालोफ्राइड बिस्किट, Vaishali Joshi
खजुरी मका कणिक शालोफ्राइड बिस्किटby Vaishali Joshi
 • तयारी साठी वेळ

  30

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

3

0

खजुरी मका कणिक शालोफ्राइड बिस्किट recipe

खजुरी मका कणिक शालोफ्राइड बिस्किट बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Khajuri Corn and Wheat Shallow fried Biscuits Recipe in Marathi )

 • गव्हाचे पीठ १ /२ कप
 • मक्या चे पीठ १/२ कप
 • डेसीकेटेड कोकोनट १/२ कप
 • खजूर १ कप
 • दूध १/४ कप पेक्षा थोड़े कमीच
 • साजुक तूप २ चमचे मोहन साठी
 • कुटलेली बड़ी शोप १/४ चमचा
 • ओवा १/४ चमचा
 • कुटलेले मीरे १/४ चमचा
 • वेलची पावडर १/२ चमचा
 • बेकिंग सोडा चिमुटभर
 • बेकिंग पावडर १/४ चमचा
 • थोड़े साजुक तूप शालोफ्राय करण्य़ासाठी

खजुरी मका कणिक शालोफ्राइड बिस्किट | How to make Khajuri Corn and Wheat Shallow fried Biscuits Recipe in Marathi

 1. प्रथम दुधात खजूर टाकुन मिक्सर मधे वाटुन घ्या मिरे , बडीशोप जाडसर कुटून घ्या
 2. आता मक्याचे पीठ आणि कणिक ( गव्हाचे पीठ )एकत्र करुन त्यात डेसीकेटेड कोकोनट , बड़ी शोप , मिरे , ओवा , वेलची पावडर , बेकिंग सोडा , बेकिंग पावडर घालून मिक्स करा
 3. त्यात पातळ केलेले साजुक तूप घालून पिठाला चोळून घ्या
 4. त्यात बारीक़ केलेला खजूर घालून पीठ भिजवून घ्या . १५ मिनिट झाकून ठेवा
 5. १५ मिनिटांनी भिजवून ठेवलेल्या पीठाचे हाताने आवडीच्या आकारात छोटे छोटे बिस्किटे करुन घ्या
 6. पैन वर मंद आचेवर सर्व बिस्किटे थोड़े थोड़े तूप साइड ने सोडून गुलाबी रंगावर शालोफ्राय करा . मस्स्त खुसखुशीत असे बिस्किटे तयार

Reviews for Khajuri Corn and Wheat Shallow fried Biscuits Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo