उपासाचे मोदक | MODAK for fasting Recipe in Marathi

प्रेषक Minal Sardeshpande  |  8th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • MODAK for fasting recipe in Marathi,उपासाचे मोदक, Minal Sardeshpande
उपासाचे मोदकby Minal Sardeshpande
 • तयारी साठी वेळ

  30

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  60

  मि.
 • किती जणांसाठी

  5

  माणसांसाठी

5

0

उपासाचे मोदक recipe

उपासाचे मोदक बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make MODAK for fasting Recipe in Marathi )

 • वरी तांदूळ पीठ दोन वाट्या
 • पाणी दोन वाट्या
 • दोन चमचे लोणी
 • मीठ
 • एका नारळाचं खोबरं साधारण तीन वाट्या
 • गूळ दीड वाटी
 • वेलची पावडर चिमूटभर

उपासाचे मोदक | How to make MODAK for fasting Recipe in Marathi

 1. नारळ फोडून खोबरं खवून घ्या.
 2. खोबरं मोजून त्याच्या निम्मे गूळ घ्या.
 3. एकत्र करून मंद गॅसवर परता.
 4. गूळ विरघळून सारण घट्ट झालं की गॅस बंद करा.
 5. वेलची पावडर मिसळा.
 6. गार होऊ द्या.
 7. वरी तांदूळ अगदी छान बारीक दळून आणा.
 8. कढईत दोन वाट्या पाणी उकळत ठेवा.
 9. त्यात लोणी आणि मीठ घाला.
 10. आता गॅस मंद करून वरीचं पीठ घालून ढवळा.
 11. झाकण ठेवून पाच मिनिटं वाफ येऊ द्या.
 12. पाच मिनिटांनी गॅस बंद करा.
 13. गरम उकड हाताला पाणी घेऊन मळा.
 14. मोदकपात्रात खाली पाणी ठेवून गॅस वर ठेवा.
 15. चाळणीत केळीचे पण ठेवा.
 16. तयार उकडीचा छोटा गोळा करून वाटीचा आकार द्या.
 17. त्यात एक चमचा सारण भरा.
 18. वाटीला चुण्या करा आणि हळूहळू जवळ आणत मोदक वळा.
 19. तयार मोदक पाण्यात बुडवून चाळणीत ठेवा.
 20. असे मोदक तयार झाले की मोदक पात्रात ठेवून 15 मिनीटं वाफ काढा.
 21. नंतर वाफवलेले मोदक तुपाबरोबर सर्व्ह करा.

My Tip:

या उकडीत मिरचीचे वाटप आणि जीरं पावडर घालून त्याच्या निवगऱ्या ही छान होतात त्याही उपासाला चालतात.

Reviews for MODAK for fasting Recipe in Marathi (0)