मुख्यपृष्ठ / पाककृती / उपासाचे मोदक

Photo of MODAK for fasting by Minal Sardeshpande at BetterButter
605
1
0.0(0)
0

उपासाचे मोदक

Jul-08-2018
Minal Sardeshpande
30 मिनिटे
तयारीची वेळ
60 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उपासाचे मोदक कृती बद्दल

आता उपासाला ही खाऊ शकता मोदक

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • नवरात्र
  • महाराष्ट्र
  • स्टीमिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. वरी तांदूळ पीठ दोन वाट्या
  2. पाणी दोन वाट्या
  3. दोन चमचे लोणी
  4. मीठ
  5. एका नारळाचं खोबरं साधारण तीन वाट्या
  6. गूळ दीड वाटी
  7. वेलची पावडर चिमूटभर

सूचना

  1. नारळ फोडून खोबरं खवून घ्या.
  2. खोबरं मोजून त्याच्या निम्मे गूळ घ्या.
  3. एकत्र करून मंद गॅसवर परता.
  4. गूळ विरघळून सारण घट्ट झालं की गॅस बंद करा.
  5. वेलची पावडर मिसळा.
  6. गार होऊ द्या.
  7. वरी तांदूळ अगदी छान बारीक दळून आणा.
  8. कढईत दोन वाट्या पाणी उकळत ठेवा.
  9. त्यात लोणी आणि मीठ घाला.
  10. आता गॅस मंद करून वरीचं पीठ घालून ढवळा.
  11. झाकण ठेवून पाच मिनिटं वाफ येऊ द्या.
  12. पाच मिनिटांनी गॅस बंद करा.
  13. गरम उकड हाताला पाणी घेऊन मळा.
  14. मोदकपात्रात खाली पाणी ठेवून गॅस वर ठेवा.
  15. चाळणीत केळीचे पण ठेवा.
  16. तयार उकडीचा छोटा गोळा करून वाटीचा आकार द्या.
  17. त्यात एक चमचा सारण भरा.
  18. वाटीला चुण्या करा आणि हळूहळू जवळ आणत मोदक वळा.
  19. तयार मोदक पाण्यात बुडवून चाळणीत ठेवा.
  20. असे मोदक तयार झाले की मोदक पात्रात ठेवून 15 मिनीटं वाफ काढा.
  21. नंतर वाफवलेले मोदक तुपाबरोबर सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर